तुकाराम खांडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या युवक तालुकाअध्यक्ष पदी निवड
फलटण प्रतिनिधी: टाकळवाडे ता. फलटण गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते श्री. तुकाराम खांडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या युवक तालुकाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र हे फलटण तालुकाध्यक्ष धर्मराज पाटील व ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी बोलताना तुकाराम खांडेकर म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या ताकतीने लढवणार असून समविचारी लोकांना सोबत घेऊन ग्रामपंचायत टाकळवाडेची निवडणूक ही लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते नंदकुमार मोरे,शहरअध्यक्ष अमीर शेख,सामाजिक कार्यकर्ते महादेव गायकवाड, सोशल मीडिया प्रमुख सचिन ठणके, व नागरिक उपस्थित होते.
Views: 283









