विडणी जिल्हा परिषद गटासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रतीक्षा विवेक मोरे मैदानात
विडणी गटासाठी तिरंगी सामना
फलटण: सातारा जिल्हा परिषद गटाच्या विडणी गटातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रतीक्षा विवेक मोरे या एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या आहेत. आयुष्याने त्यांच्यावर मोठा आघात केला—त्यांचे पती स्वर्गीय विवेक मोरे यांचे अकाली निधन झाले. विवेक मोरे हे इंजिनियर होते, पण केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता त्यांनी समाजासाठी जगणे निवडले होते.
पिंप्रद गाव असो वा पंचक्रोशी, सामाजिक प्रश्नांवर धावून जाणारा, गरजूंना मदतीचा हात देणारा विवेक मोरे आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांची समाजनिष्ठा आजही जिवंत आहे.
वंचित बहुजन आघाडी हा पक्ष शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी सातत्याने लढणारा पक्ष आहे. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक न्याय, समता आणि माणुसकी या मूल्यांवर ठाम उभा असलेला हा आवाज आहे.
पतीच्या जाण्याने खचून न जाता, त्यांच्याच सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार श्रीमती प्रतीक्षा विवेक मोरे यांनी केला आहे. एका कणखर महिलेसारख्या त्या आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाजाच्या सेवेसाठी उभ्या आहेत.
विडणी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांचे उमेदवार उभे असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीने विडणी जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगी सामना राहणार आहे.यामुळे चुरस निर्माण झाली आहे.









