हॉटेल आईची माया समोर डिव्हायडरला धडकून तरुणाच्या मृत्यनंतर अखेर प्रशासनाला आली जाग! विडणी येथील हॉटेल आईची माया व्यवस्थापकांनी डिव्हायडर फोडून केलेला रस्ता प्रशासनाने केला बंद.. कायमस्वरूपीचे डिव्हायडर बसवले जाणार का? प्रवाशांचा प्रश्न

हॉटेल आईची माया समोर डिव्हायडरला धडकून तरुणाच्या मृत्यनंतर अखेर प्रशासनाला आली जाग!

विडणी येथील हॉटेल आईची माया व्यवस्थापकांनी डिव्हायडर फोडून केलेला रस्ता प्रशासनाने केला बंद..

कायमस्वरूपीचे डिव्हायडर बसवले जाणार का? प्रवाशांचा प्रश्न

फलटण: यापूर्वीची बातमी..

विडणी येथील हॉटेल आईची माया समोर डिव्हायडरला धडकून भीषण अपघात

अपघातात एका तरुणाचा मृत्यू

तर तरुणी गंभीर जखमी.

हॉटेल आईची मायाचे व्यवस्थापक यांनी हायवेवरील डिव्हायडर हा गिऱ्हाईक येण्यासाठी परस्पर फोडलेला असून यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे का? पोलिस निष्पक्षपणे चौकशी करणार का?

फलटण: ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 15/02/2026 रोजी सायंकाळी 07:30 वा चे सुमारास मौजे विडणी ता फलटण गावचे हद्दीत पंढरपुर ते फलटण जाणारे रोडवर हॉटेल आईची माया समोर बजाज कंपनीची पल्सर 220 वरील चालक निवृत्ती सोमनाथ रुपनवर वय 19 वर्षे रा भांब .ता माळशिरस जि सोलापुर यांचे वाहन येथील डिव्हायडरला धडकून भीषण अपघात झाला. वाहन चालक निवृत्ती रुपनवर यांना शासकीय दवाखान्यात उपचार करता नेहेले असता उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. व गाडीवरील सहप्रवासी प्रीती कांबळे रा. भांब ता.माळशिरस हिला गंभीर दुखापत झाली असून. फलटण येथील खाजगी दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू आहे.

घटनेचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करीत आहेत.

हॉटेल आईची मायाचे व्यवस्थापक यांनी हायवेवरील डिव्हायडर हा गिऱ्हाईक येण्यासाठी परस्पर फोडलेला दिसून येत असून यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे का? याची ही पोलिस निष्पक्षपणे चौकशी करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच हायवे अथोरिटीने अशाच प्रकारे अनेक हॉटेल व्यवसाय व्यवसायिकांनी पुणे पंढरपूर हायवे वरील डिव्हायडर फोडलेले असून वाहनांना गिर्‍हाईकांना आपल्याकडे येण्यासाठी अनधिकृत रस्ता वळण बनवलेला आहे. यावर देखील हायवे अथोरिटीने कार्यवाही करणे अपेक्षित असून यापुढे असे अपघात होऊ नयेत .यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आताची बातमी…

हॉटेल आईची माया समोर डिव्हायडरला धडकून तरुणाच्या मृत्यनंतर अखेर प्रशासनाला आली जाग!

विडणी येथील हॉटेल आईची माया व्यवस्थापकांनी डिव्हायडर फोडून केलेला रस्ता प्रशासनाने केला बंद..

फलटण: विडणी ता. फलटण येथील हॉटेल आईची माया व्यवस्थापकांनी पुणे पंढरपूर हायवे वरील रोड डिव्हायडर फोडून आपला हॉटेलकडे ग्राहकांनी येण्यासाठी रस्ता तयार केला होता. परंतु या ठिकाणी यापूर्वीही अपघात झाला होता. व काही दिवसापूर्वी येथे तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता.

या घटनेची बातमी आपल्या Ap न्यूजने घेतली होती.सदर बातमी नंतर प्रशासनाने या ठिकाणी आयत्या डिव्हायडरच्या भिंती उभ्या केल्या असून. या ठिकाणी कायमस्वरूपी डिव्हायडर बसवणे गरजेचे आहे. Ap न्यूजच्या पाठपुरावाला यश आले आहे. प्रवाशांकडून व ग्रामस्थांकडून Ap न्यूजचे आभार मानले जात आहेत.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!