निष्ठावंतांना डावलले! आयारामांना संधी! राजाळे गावाला पंचायत समिती तिकीट न मिळाल्यामुळे विश्वासराव भोसले गट नाराज?

निष्ठावंतांना डावलले! आयारामांना संधी! राजाळे गावाला पंचायत समिती तिकीट न मिळाल्यामुळे विश्वासराव भोसले गट नाराज?

फलटण: फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागलेल्या असल्याने राजकीय वातावरण तापायला लागले आहे.

अशामध्येच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी राजाळे गावचे सुपुत्र विश्वासराव भोसले यांचा गट हा गावाला तिकीट न मिळाल्याने नाराज आहे.कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. राजाळे गावात ग्रामपंचायत व सोसायटीवर एकहाती सत्ता भोसले गटाकडे आहे. मोठे गाव आहे. पंचक्रोशीसाठी मोठी बाजारपेठ आहे.

यापूर्वी जे लोक राजाळे गावातून तिकीट मिळालेले होते ते निवडून आले होते.यामध्ये पाठीमागील टर्मसाठी सातारा जिल्हा परिषदेसाठी सौ.कांचनमाला संभाजी निंबाळकर निवडून आल्या होत्या. तसेच पंचायत समितीला निवडून आलेले रवींद्र(आप्पा) भोसले, सौ.कल्पना महावीर भालेराव हे सदस्य राजाळे गावचे होते. यामुळे राजाळे गावातील उमेदवार हे पंचायत समिती गणात निवडून येतात हा इतिहास आहे.

यावेळी राजाळे गावाला राजे गट शिवसेना यांचेकडून सौ.पुष्पा रामचंद्र चोपडे यांना पंचायत समितीला उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे राजाळेकर गावाच्या उमेदवाराला निवडून देण्यात भूमिका बजावणार का? की माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांचा गट नाराजी दूर करून भाजप व राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवाराचे काम करण्यात कितपत यशस्वी होणार हे आगामी काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

क्रमशः…

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!