टाकळवाडे येथे विश्वजीतराजे यांचे हस्ते शिवसेना उमेदवारांचा प्रचाराचा नारळ
टाकळवाडे गावात घरोघरी ग्रामस्थांनी केले उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत
फलटण: ग्रामपंचायत टाकळवाडे येथे पद्मावती मंदिरात शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ.ज्योती गौतम मोरे व पंचायत समितीच्या उमेदवार सौ.पुष्पा रामचंद्र चोपडे यांच्या प्रचाराचा नारळ फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते फोडण्यात आला.
यावेळी बोलताना विश्वजीतराजे म्हटले की तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारायचे असेल तर आम्हाला मतदान करा आम्ही तुमच्या हाताला रोजगार देऊ.आम्ही लोक लोकांना मदत करणारे आहोत.आमच्या हातून कधीच कोणाचे वाईट होणार नाही.
यावेळी विरोधकांवर बोलताना विश्वजीतराजे म्हणाले की विरोधकांकडे असणारी चार लोकांची नावे सांगा जी आर्थिक दृष्ट्या ,सामाजिक दृष्ट्या सुधारलेली आहेत. उलट आमच्याकडील गेलेले लोक तिकडे गेल्यावर मायनस झाले आहेत.
यावेळी सांगवी गावचे मा.सरपंच पोपटराव बुरुंगले, टाकळवाडे गावच्या सरपंच सौ.सांगळे, माजी सरपंच राहुल इवरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक कुमार शेडगे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सहदेव मिंड, सोसायटी माजी चेअरमन बाळासाहेब मुळीक,कल्याण इवरे,बाळासाहेब मिंड,मल्हारी जाधव, राजाळे गावचे संदीपदादा पवार,विनोद शेडगे, धनाजी जाधव,अजित निंबाळकर, ॲड. एम.के.शेडगे, व ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रचार सभेनंतर गावातून रॅली काढण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले.









