सासकल येथे  कृषी विभागाच्या वतीने एल निनो जनजागृती शेतकरी शिवार फेरी 

सासकल येथे  कृषी विभागाच्या वतीने एल निनो जनजागृती शेतकरी शिवार फेरी

फलटण – कृषी विभागा मार्फत सासकल ता. फलटण जि. सातारा येथे एल निनो बाबत जनजागृती शेतकरी शिवार फेरी आयोजन करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ शेतकरी म्हणून वामन दिनकर मुळीक, मनोहर दिनकर मुळीक,ज्ञानदेव रघुनाथ मुळीक, सिताराम दिनकर मुळीक प्रगतिशील शेतकरी व महिला उपस्थित होते.

एल निनो जनजागृती शिवार फेरीचे आयोजन मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे,उपविभागी कृषी अधिकारी फलटण खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड,मंडळ कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे उप कृषी अधिकारी अजित सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.

यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सासकल सचिन जाधव यांनी  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ,एल निनो (El Nino) मुळे मान्सून पाऊस कमी होण्याची किंवा अनिश्चिततेची शक्यता असते, ज्यामुळे शेतीवर, विशेषतः खरीप हंगामावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून पिकांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी सांगितले

तसेच खालील उपाययोजना शेतकऱ्यांनी एल निनोच्या काळात उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले

१. पेरणीपूर्व आणि पीक नियोजन:

कमी पाण्यावर येणारी पिके: भात किंवा ऊस यांसारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी बाजरी, ज्वारी, मका, सूर्यफूल, सोयाबीन, तूर आणि मूग यांसारख्या कमी कालावधीत येणाऱ्या आणि दुष्काळ सहन करणाऱ्या पिकांची निवड करावी.

पेरणीत बदल: मान्सूनचा अंदाज घेऊन पेरणीची तारीख थोडी पुढे ढकलल्यास पिकांचे नुकसान टाळता येईल.

आंतरपीक पद्धती: आंतरपीक पद्धतीचा (उदा. सोयाबीन + तूर) वापर केल्यास जोखीम कमी होते आणि उत्पन्नात सातत्य राहते.

२. जल व्यवस्थापन (Water Management):

ठिबक सिंचन: पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक (Drip) किंवा तुषार (Sprinkler) सिंचनाचा वापर अनिवार्य करावा.

मल्चिंग (Mulching): जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांच्या दोन ओळींत मल्चिंग (प्लास्टिक किंवा पिकांचे अवशेष) करावे, यामुळे बाष्पीभवन कमी होते.

पाण्याचे पुनर्भरण: उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि शेततळ्यांमध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था करावी.

३. जमीन आणि पीक आरोग्य:

सेंद्रिय खते: जमिनीत शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा, ज्यामुळे जमिनीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

पिक संरक्षण: एल निनो काळात उष्णतेमुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पिकांचे नियमित निरीक्षण करावे आणि तज्ञांच्या सल्ल्यानेच योग्य फवारणी करावी.

४. इतर महत्त्वाचे उपाय:

पीक विमा: ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ अंतर्गत पिकांचा विमा उतरवणे, जेणेकरून दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत मिळेल.

हवामान अंदाज: भारतीय हवामान विभाग (IMD) च्या नियमित अंदाजांचे निरीक्षण करून शेतीची कामे करावीत.

हे उपाय शेतीतील जोखीम कमी करण्यास आणि कठीण हवामानातही उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सचिन जाधव यांनी सांगितले .यावेळी एल निनो जनजागृती शेतकरी शिवार फेरीमध्ये सासकल गावातील पंचक्रोशीतील शेतकरी व महिला उपस्थित होते

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!