जिल्हा परिषद शाळा तडवळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल मुंबई येथे उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात; विधानभवन, मंत्रालय,मुंबई हायकोर्ट येथे विद्यार्थ्यांच्या भेटी!  युवा उद्योजक ससमीरभैय्या खराडे यांचे विशेष प्रयत्नातून सहलीचे आयोजन; फलटण तालुक्यात सहलीचे सर्वत्र कौतुक!


जिल्हा परिषद शाळा तडवळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल मुंबई येथे उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात; विधानभवन, मंत्रालय,मुंबई हायकोर्ट येथे विद्यार्थ्यांच्या भेटी!

 

युवा उद्योजक ससमीरभैय्या खराडे यांचे विशेष प्रयत्नातून सहलीचे आयोजन; फलटण तालुक्यात सहलीचे सर्वत्र कौतुक!

 

फलटण: जिल्हा परिषद शाळा तडवळे यांची मुंबई येथील शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांच्या उत्साहात व आनंदात पार पडली.

 

सकाळी 5.30 वाजता मा श्री ह .भ प कुमार महाराज खराडे ,ग्रामस्थ , महिला पालक व शिक्षक वर्ग यांचे हस्ते शैक्षणिक सहलीच्या वाहनाचे पुजन श्रीफळ वाढवून झाले. व सहल मुंबई कडे निघाली.

 

वेळ 10.00 वारणा सहकरी दुध उत्पादक संघ नेरूळ येथे जि .प शाळा तडवळे शैक्षणिक सहल आगमन झाले.यावेळी सौ.प्रीतीताई समीर खराडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याठिकाणी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी जेवणाचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था युवा उद्योजक श्री समीरभैया खराडे यांच्या परिवाराकडून करण्यात आली होती. नंतर विद्यार्थ्यांनी वारणा दूध उत्पादक संघ दुध व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीची पाहणी केली.

नंतर जि प शाळा तडवळे शैक्षणिक सहल मुंबई येथील विधानभवनात गेली. यावेळी विधानसभा सभागृह व विधान परिषदेचे सभागृह या दोन्ही सभागृहाची संपुर्ण कामकाज माहीती सभापती दालन पाहणी व आधिवेशन कामकाज माहीती व संपुर्ण मंत्री मंडळ बैठक व्यवस्था पाहणी केली.तडवळे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे वतीने मा श्री अशोक विलास खराडे पाटील व जि प शाळा तडवळे यांचे वतीने मा श्री किशोर चांदगुडे सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली

 

 

यावेळी विधानसभा अध्यक्ष मा श्री राहुलजी नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष मा. संजयजी बनसोडे यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला विद्यार्थ्यांसाठी ही ऐतिहासिक भेट ठरली.

 

यानंतर शालेय सहल मुंबई उच्च न्यायालय येथे गेली.मुंबई उच्च न्यायालय म्युझियम मध्ये विद्यार्थ्यांनी ब्रिटिश सरकार पासुन देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत सर्व कामकाज व कारभार व मुंबई कशी तयार झाली यांची माहीती घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सर्व दस्तावेज व उच्च न्यायालय मधील सर्व न्यायाधीश नामफलक फोटो व परिचय व ते त्या काळामध्ये परिधान करत आसलेले कपडे पहाणी केली.

भारतीय संविधान व ब्रिटिशकालीन दस्तावेज व वस्तुची पाहणी केली.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश श्री महेशचंद्र त्रिपाठी यांचे खंडपीठासमोर प्रत्यक्षात चाललेल्या सुनावणीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. उपस्थित वकिल यांची भेट घेतली . मा उच्च न्यायालय म्युझियममधील अधिकारी यांचे आभार व्यक्त करणारे श्री बांडे सर यांचे भाषण झाले.

 

यानंतर कळंबोली पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री.रणजित जाधव साहेब यांचे विद्यार्थी वर्गास भरती प्रक्रियेबद्दल व पोलीस स्टेशन कारभाराविषयी बहुमूल्य असे मार्गदर्शन झाले.पोलीस स्टेशन प्रत्यक्ष पहाणी केली. कळंबोली अग्निशमन दल येथे भोजन व आभार सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी रात्री 3:00 आराध्य दैवत भैरवनाथ नगरी तडवळे येथे जि प शाळा तडवळे येथे विद्यार्थी शिक्षक पालकांचे सुखरूप आगमन झाले.

 

 

या शैक्षणिक सहलीसाठी युवा उद्योजक मा श्री.समीरभैय्या शरद खराडे यांचे विशेष सहकार्यातून व प्रयत्नांतून जि प शाळा तडवळेची शैक्षणिक सहल मुंबई येथे उत्साहात व आनंदात पार पडली.

 

 

यावेळी मुख्याध्यापक किशोर चांदगुडे सर ,बांडे सर ,अशोक खराडे फौजी ,सरपंच प्रशांत चंद्रकांत खराडे ,दिपक जगन्नाथ पवार शाळा समिती अध्यक्ष,शरद विठ्ठल खराडे,अनंतराव जगन्नाथ भोसले,समीर जर्नाधन जाधव व सर्व तडवळे ग्रामस्थ यांनी सहलीच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

 

जिल्हा परिषदेच्या तडवळे शाळेने केलेल्या या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांना दिलेल्या या अनुभवाबद्दल जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी सर, फलटण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सी. जी मठपती यांनी शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले आहे. व तालुक्यातील इतर शाळांनी तडवळे शाळेचा आदर्श घेऊन असे उपक्रम राबवावे असे आवाहन केले आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!