अपक्ष उमेदवार अनमोल जगताप यांचा सरपंच सागर अभंग यांच्या विडणी विकास आघाडीला पाठिंबा जाहीर!

अपक्ष उमेदवार अनमोल जगताप यांचा सरपंच सागर अभंग यांच्या विडणी विकास आघाडीला पाठिंबा जाहीर!

विडणी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत विडणी गावातील पाच नंबर वार्डात मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेले अनमोल नंदकुमार जगताप यांनी स्वतःच्या उमेदवारीपेक्षा निष्ठेला प्राधान्य देत थेट लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या पाठीशी उभे राहत जाहीर पाठिंबा दिला आहे.

“मी पाच नंबर वार्डमधील सर्व मतदारांना स्पष्ट आवाहन करतो की, माझी भूमिका केवळ निवडणूक लढवण्यापुरती मर्यादित नाही. मी सागर अभंग आणि विडणी विकास आघाडीशी एकनिष्ठ राहणार आहे,” असे ठाम विधान जगताप यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.

त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून वार्डात निर्माण झालेली राजकीय चुरस आता एका नव्या वळणावर आली आहे. स्वतः उमेदवारी दाखल करूनही पाठिंबा जाहीर करण्यामागे नेमका काय राजकीय डाव आहे, यावर गावात जोरदार चर्चा रंगली आहे.

जगताप यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे विरोधकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, विडणी विकास आघाडीला याचा थेट फायदा होणार का? हे येणाऱ्या मतदानातून स्पष्ट होणार आहे. गावाच्या राजकारणात आता खरी लढत अधिक तीव्र होणार, हे मात्र निश्चित!

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!