भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

फलटण : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या वतीने फलटण नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला. संघटनेच्या वतीने शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.घनश्याम बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार हा झाडे देऊन केला गेला.सदर कार्यक्रमाचे नियोजन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलाताई जाधव,जिल्हाध्यक्ष सुषमा पवार यांनी केले होते.

यावेळी पोलिस हवालदार महेश जगदाळे, भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, संपर्कप्रमुख शुभम गायकवाड ,जनशक्ती कंत्राटी कामगार संघ बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे , सामाजिक कार्यकर्ते विजय भोंडवे,प्रतिक चव्हाण, मनिषाताई मोरे उपस्थित होते.

फलटण नगर परिषद शाळा क्रमांक ८ चे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी संघटनेचे आभार व्यक्त केले.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!