फलटण येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने वारकऱ्यांच्या चरणसेवेचा उपक्रम
फलटण, दि. १७ जुलै- श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त फलटण येथील **यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसरात** आर्ट ऑफ लिव्हिंग, फलटण संस्थेच्या वतीने वारकऱ्यांसाठी भावपूर्ण **चरणसेवा** उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. “सेवा हीच खरी साधना” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात वारकऱ्यांचे पाय स्वच्छ धुऊन त्यांची प्रेमपूर्वक सेवा करण्यात आली. या सेवेमुळे अनेक वारकऱ्यांचा प्रवासातील थकवा दूर झाला असून, त्यांनी स्वयंसेवकांना मनःपूर्वक आशीर्वाद दिले.
या सेवाभावी उपक्रमामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे प्रशिक्षक **श्री बाळासाहेब बिचुकले, श्री सचिन ताम्हाणे,*
*आणि स्वयंसेवक अमोल ठणके, सचिन सोनवलकर, साईराज यादव, सार्थक चिकणे, सार्थक सोनवलकर, पार्थ कदम आणि अक्षय वावरे** यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. स्वयंसेवकांनी अत्यंत नम्रतेने व भक्तिभावाने वारकऱ्यांची सेवा करून समाजासमोर सेवाभावाचा आदर्श ठेवला.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक **परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर** यांच्या *”सेवा हीच साधना”* या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. समाजात सेवा, करुणा आणि मानवतेची भावना रुजविण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने अशा विविध सेवाभावी उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी लाभल्याबद्दल सहभागी स्वयंसेवकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही समाजोपयोगी, सेवाभावी आणि संस्कारक्षम उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.









