सततच्या तक्रारीनंतर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची 8 महिन्यातच बदली?
सामाजिक कार्यकर्ते अवधूत धुमाळ यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले!जिल्हा पोलिस प्रमुख निखील पिंगळे यांचे मानले आभार
फलटण: पोलीस निरीक्षक अरविंद काळे हे गोतस्करांना पाठिशी घालत असल्याचा खळबळजनक आरोप काही दिवसांपूर्वीच मानद पशुकल्यान अधिकारी अवधुत धुमाळ यांनी केला होता. व त्यांची तातडीने चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे केली होती .
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे लेखी तक्रार गोरक्षक अवधुत धुमाळ यांनी केली होती.
गोतस्करांना पाठीशी घालणं पोलीस निरीक्षक अरविंद काळेंना भोवलं असल्याची चर्चा सर्वत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे.
अरविंद काळे यांच्या बदलीने हिंदूत्ववादी कार्यकर्ते गोरक्षक अवधुत धुमाळ व यांनी समाधान व्यक्त केलं आहे व जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सरांचे आभार मानले आहेत.









