कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील- सभापती कु. शिवांजली भोसले  पंचायत समिती फलटण येथे कृषी दिन उत्साहात साजरा


कृषी विभागाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील- सभापती कु. शिवांजली भोसले

 

पंचायत समिती फलटण येथे कृषी दिन उत्साहात साजरा

फलटण: फलटण पंचायत समितीमध्ये स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, फळ पिकांसाठी व इतर सर्व पिकांसाठी ए. आय. टेक्नॉलॉजीचा वापर करावा, रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खत, जैविक खत इत्यादी खतांचा वापर करावा तसेच कृषी विभागाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन असेही त्या म्हणाल्या, तसेच भारती ग्रीन टेक चे श्री विनय पोळ यांनी शेतामध्ये जैविक खतांचा वापर, रासायनिक खताचे दुष्परिणाम याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले, तसेच प्रगतशील शेतकरी श्री अनिल कदम यांनी देखील मार्गदर्शन केले. जिल्हा पातळी व तालुका पातळी पिक स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्र व रोप देऊन सत्कार करण्यात आला .

 

त्याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले तसेच पंचायत समितीचे सदस्य वनिता आढाव , सचिन अभंग,राहुल नरुटे, संतोष कारंडे, तसेच गटविकास अधिकारी श्री अक्षय घावटे सर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री मोमीन साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री दत्तात्रय गायकवाड सर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री नवनाथ फडतरे तसेच प्रगतशील शेतकरी व महाराष्ट्र शासन कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!