सासकलचे शेतकरी बबन मुळीक यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर
कृषी विभागाकडून अभिनंदन
फलटण – श्री बबन रामचंद्र मुळीक गाव सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा येथील फलोत्पादक शेतकरी असून त्यांनी डाळींब, सीताफळ, आव्हाकोडो ची लागवड केली आहे कष्ट तसेच जिद्दी च्या जोरावर त्यांनी माळरानवर फळबाग फुलवले आहे शेतामध्ये विविध प्रयोग व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून फळ पिकाची उत्पादन घेत आहेत सेंद्रिय निविष्टा मध्ये गांडूळ खत युनिट उभारणी करून खाताचे उत्पादन घेऊन फळं पिकास गांडूळ खत मात्रा दिले जातात तसेच दशपर्णी अर्क, जीवामृत,व्हर्मिव्हाश चा वापर करतात
कृषी विभागाच्या विविध उपक्रमामध्ये ते सहभाग नोंदवला आहे
कृषि विभागाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड अंतर्गत अॅव्होकॅडो.त्यांनी महाराष्ट्रातील पहिले लागवड केली आहे
कृषि विभागाच्या AI (कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फळपीक शेती ) तंत्रज्ञानाच्या आधारे फळबाग लागवड पासून डाळींब, सीताफळ,अॅव्होकॅडो.वॉटर अँपल उत्पादन घेत आहेततसेच २३ प्रकाची इतर फळपीके तसेच इतर पिके लागवड केले आहे
प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना द्वारे संपूर्ण फळबाग १०० % ठिबक सिंचन द्वारे पाणी व्यवस्थापन केले आहे
श्री बबन रामचंद्र मुळीक शेतकरी ते ग्राहक फळांची विक्री करतात
त्यांच्या पत्नी संगीता बबन मुळीक, मुलगा अजिक्य बबन मुळीक, निखिल बबन मुळीक यांच्या अमूल्य साथ असल्याने शक्य झाले चे सांगितले
गावचे सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी कृषि विभागचे चे विविध उपक्रम राबविण्यात आले त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले
महाराष्ट्र शासन कृषि विभागाचा मानाचा सर्वउत्तम पुरस्कार समजला जाणारा उद्यान पंडित पुरस्कार श्री बबन रामचंद्र मुळीक यांना कोल्हापूर विभागातून जाहीर झाल्याबद्दल
जिल्हा अधिकारी सातारा संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा याशनी नागराजन,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड,मंडळ कृषि अधिकारी विडणी अशोक जगदाळे, उप कृषि अधिकारी विडणी अजित सोनवलकर, सहाय्यक कृषी अधिकारी सासकल तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव या निवडी बद्दल अभिनंदन केले.









