मिंड पॅटर्न म्हणजे फुसका बार! एका आडनावावर व जाती- धर्मावर दीर्घकालीन राजकारण करता येत नाही! फक्त मिंड परिवाराचे राजकारण न करता गावातील सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणार -भारत भाऊसो मिंड -पाटील

मिंड पॅटर्न म्हणजे फुसका बार! एका आडनावावर व जाती- धर्मावर दीर्घकालीन राजकारण करता येत नाही!

फक्त मिंड परिवाराचे राजकारण न करता गावातील सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणार -भारत भाऊसो मिंड -पाटील

फलटण: आगामी टाकळवाडे गावातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतसे एक एक पत्ते बाहेर येत आहेत.

मिंड पॅटर्न म्हणुन राजकारण करता येणार नसून एका आडनावावर किंवा धर्म जातीवर दीर्घकालीन राजकारण करता येत नाही! जो सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण करतो तोच गाव गाड्यात दीर्घकालीन राजकारणात टिकून राहतो. आगामी निवडणुकीना सामोरे जाताना गावातील सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणार असुन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावणार आहे असे भारत भाऊसो मिंड पाटील यांनी आपले मत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.

तसेच ते म्हणाले की, मिंड परिवार पॅटर्न हा परिवारातील लोकांचे सुख दुःख वाटून एकत्रित करण्यासाठी आहे.परंतु या आडून कोणी फलटण मध्ये बसून राजकारण करू नये.तसेच मिंड परिवारातील तरुणांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. गावगाड्यात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाची गरज असते.टाकळवाडे गावाचा सामाजीक सलोखा हा वेगळा आहे.यामध्ये कोणतेही विघ्न येऊ देणार नाही.आज पर्यंत मिंड परिवाराने अनेक पदे भुषवली आहेत. यात सर्व समाजाचे योगदान आहे व त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. तरुणांच्या शपथ घेऊन त्यांचे भावनिक राजकारण केले जात असून यामुळे नाती-गोती तुटण्याच्या मार्गावर आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारे सामाजिक द्वेष पसरवून मिंड परिवाराच्या आडून कोण राजकारण करणार असेल तर अशा अपप्रवृत्तींना आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकारणाच्या शाळेतील योग्य तो धडा शिकवला जाईल असे ही भारत भाऊसो मिंड पाटील यांनी म्हटले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!