फलटण नगरपालिकेचे अभ्यासिका, वाचनालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष!  2 महिन्यांपासून वर्तमानपत्रे उपलब्ध नसल्याचे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे!  स्पर्धा परीक्षा देऊनच अधिकारी झालेले मुख्याधिकारी निखिल जाधव लक्ष घालणार का?

फलटण नगरपालिकेचे अभ्यासिका, वाचनालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष!

2 महिन्यांपासून वर्तमानपत्रे उपलब्ध नसल्याचे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे!

स्पर्धा परीक्षा देऊनच अधिकारी झालेले मुख्याधिकारी निखिल जाधव लक्ष घालणार का?

फलटण – बादशाही मशीद शेजारी असलेल्या फलटण नगरपालिकेच्या कै.भाऊसाहेब जिजाजीराव जाधव वाचनालय व रात्र अभ्यासिका येथे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एकही वृत्तपत्र उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.येथे अभ्यास करून अनेक मुले- मुली ही उच्च पदावर पोहोचलेली आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी अभ्यास करायला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरवलेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सोयी सुविधा कमतरता आहेत.

या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी वृत्तपत्र अत्यावश्यक असताना मागील चार महिन्यांपासून येथे एकही वृत्तपत्र येत नाही. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर थेट परिणाम होत आहे. वाचनालय आणि अभ्यासिका ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सुविधा असूनही मूलभूत सोयींचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, समोरच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयात नियमित वृत्तपत्रांची सोय उपलब्ध आहे. त्याच्या तुलनेत नगरपालिकेच्या अभ्यासिकेत केवळ बैठकीची व्यवस्था असून माहितीपर साधनांचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. तसेच, फलटण नगरपालिकेच्या वाचनालयाच्या दर्शनी भागावर वेळापत्रक, सुट्टीचे दिवस याबाबत कोणतीही माहिती लावलेली नाही.नगर पालिकेच्या स्वामी विवेकानंद वाचनालयालाही भेट दिली असता, ते सकाळी साडे अकराच्या सुमारास बंद असल्याचे दिसून आले, मात्र कामकाजाची स्पष्ट माहिती दर्शनी भागात  उपलब्ध नव्हती.

याविषयी फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडून आवश्यक त्या सोयीसुविधा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, वाचनाला येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध कराव्यात अशी मागणी विद्यार्थी वर्ग करत आहेत. मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी पााहणी करावी व परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज आहे.कारण की एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी झालेला व्यक्तीच या अडचणी सोडवू शकतो..

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!