डॉक्टरला भरदिवसा लुटले!
फलटण पूर्व भागात चोरांची दहशत,पोलिसांसमोर चोरांचे आव्हान!
फलटण: ग्रामीण पोलीस स्टेशन फलटण येथून मिळालेल्या माहितीनुसार व अजित राजकुमार साबळे धंदा वेटरनरी डॉक्टर रा. हणमंतवाडी, ता. फलटण, जि. सातारा यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर राहुन दिलेल्या फिर्यादीवरून, मी वरील प्रमाणे व्यवसाय करीत असतो तसेच माझा दुग्ध व्यवसाय असल्याने माझ्या गायीचा गोठा आहे. त्यामुळे गायी खरेदी करीत असतो.
काल तारीख 01/07/2026 रोजी मी माझे मोटार सायकल MH 11 AN3637 वरुन 12:30 वाजता हणमंतवाडी येथुन जावली ता. फलटण येथे जर्शी गाय विकत घेण्यासाठी गेलो होतो. त्यांनतर मी जावली येथुन 02:00 वाजता घरी येण्यासाठी निघालो. मी जाताना गाई खेरेदीसाठी 27,000/- रु घेवून गेलो होतो. परंतु गाईचा व्यवहार न झाल्याने मी माघारी निघालो. जावली ते राजुरी फाटा रोडने कुरवली तलावाजवळ 02:30 वा. आलो. त्यावेळी मला लघुशंका आल्याने मी थांबलो होतो. तेवढयात तिथे विना नंबर च्या स्प्लेंडर मोटार सायकलवरुन तिन अनोळखी इसम आले व त्यांनी मला धमकावण्यास सुरवात केली. त्यातील लाल शर्ट असलेल्या इसम माझ्याजवळ आला. त्याने मला पैश्याची मागणी केली मी त्यांना नकार दिल्यावर त्यातील दुस-या काळया रंगाच्या शर्टवर असणा-या इसमाने चाकु काढुन दाखवून पैश्याची मागणी करुन मला जिवे मारण्याची धमकी दिली व तिस-या ऊभ्या पांढरा पटयाच्या शर्ट असणा-या इसमाने माझ्या पेंटीच्या उजव्या खिशात हात घालुन पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना मी विरोध केल्यावर तिघांनी मला हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण करुन पुन्हा चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत काळया शर्टवाल्या इसमाने माझ्या पेंटीच्या उजव्या खिशात असणारे पैसे काढुन घेतले. तसेच त्यानेच माझ्या पॅन्टच्या डाव्या खिशात असणारा विवो कंपनीचा फोन काढुन घेतला तसेच माझ्या फेशन प्रो. मोटार सायकलची MH 11 AN3637 चावी घेवून ते राजुरी पाटी ता. फलटणच्या दिशेने ते तिघेही पळुन गेले. तरी त्यांनी मारहाण करून चोरी केलेल्या रकमेचा व मोबाईलचे वर्णन खालील प्रमाणे
1) 27,500/-रुपये, त्यात 500 रु च्या 200 चलनी नोटा, 200 रु च्या 70 चलनी नोटा 100 रु.च्या 15 चलनी नोटा अश्या वर्णनाच्या चलनी नोटा.
2) 20,000/- रु किंमत असलेला vivo कंपनीचा सोनेरी रंगाचा vivo yg क्र जि. मॉडेल असलेला त्याचा IMEI NO 1) 866423077439039 ΙΜΕΙ ΝΟ 2) 866423077439021 असा असलेला जु.वा.कि.अं.
3) 100/- रु हिरो हाले ंडा MH 11 AN3637 पेंशीयन प्रोव्ह कंपनीच्या गाडीची चावी
47,600/-रु येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किमतीचा मुददेमाल माझे संमत्ती शिवाय 03 अनोळखी इसमांनी चाकुचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी देवून मला मारहाण करून चोरुन नेली आहे.
तरी दिनांक-01/07/2026 रोजी दुपारी 02.30 वा.चे सुमारास मौजे कुरवली बुद्रुक, ता. फलटण, जि. सातारा गावचे हद्दीत जावली ते राजुरी फाटा रोडवर कुरवली तलाव्याजवळ मला तिन अनोळखी इसम मोटार सायकल वरुन येवून मला चाकुचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी देवून हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण करुन माझेकडील रोख रक्कम, मोबाईल व मोटार सायकलची चावी जबरदस्तीने काढून घेवून चोरून नेली आहे.
03 अज्ञात इसमांचे विरुध्द तक्रार गुन्हा दाखल झाला असून बरड पोलीस दुरुक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष मठपती तपास करत आहेत.









