“राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक, कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज करावेत” – जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील
सातारा: महाराष्ट्र राज्यातील मान्यवर जेष्ठ साहित्यिक व प्रयोगात्मक कलामध्ये पूर्णवेळ चरितार्थ अवलंबून सलेले कलाकार यांना राजषी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत सनधन देण्यांत येणार आहे. सदर योजने अंतर्गत दिनांक 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 अखेर Online कदतीने अर्ज मागविण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. सदर योजनेसाठी पात्रतेचे निकष अटी व शर्ती खालीलप्रमाणे.
पात्रता
ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षाने शिथील करण्यांत येत आहे. (दिव्यांगांना वयोमर्यादा ४०वर्षे)
ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५वर्ष आहे.
ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे.
वयाने जेष्ठ असणारे, विधवा/परितक्ता
कलाकाराचे सर्व मार्गानी कटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबुन आहे असे कलाकार तसेच जे कलाकार
फक्त कलेवरच अवलंबुन होते. मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार.
केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासीक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार.
कलाकार / साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
तरी वरील प्रमाणे पात्र असलेल्या कलाकारांनी अर्जासोबत १. वयाचा दाखला २. आधारकार्ड ३. उत्पन्नाचा दाखला ४. रहिवासी दाखला. ५. प्रतिज्ञापत्र ६. पती व पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास) ७. बँक तपशील ८. अपंगत्व दाखला (लागू असल्यास) ९. राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास) १०. नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास) ११. विविध पुरावे इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
तरी लाभार्थ्यानी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/enया लिंकवर पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग अंतर्गत नोंदणी करणेत यावी.
अर्ज करण्याची मुदत :- १ जुलै २०२६ ते ३१ जुलै २०२६
(कोणत्याही परिस्थितीत अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येणार नाही अशा सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या सुचना आहेत.)
जास्ती जास्त लोकांनी याचा फायदा घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील,सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती
तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्री.राहुल देसाई सातारा जिल्हा परिषद सातारा यांनी आवाहन केले आहे.









