धुळदेव येथे अज्ञात व्यक्तीचा मृत्यू
भरधाव गाडीने उडवले.
फलटण: फलटण शहर पोलीस स्टेशन यांच्या माहितीवरून व पवन विश्वास आडके वय ३४ वर्षे, व्यवसाय-पोलीस पाटील, रा.धुळदेव, ता. फलटण, जि. सातारा यांचे फिर्यादीवरून
गु.घ.ता.वेळ
दिनांक-२०/०६/२०२६ रोजीचे सकाळी ०५.४५ वा.चे पुर्वी (नक्की वेळ माहित नाही) धुळदेव ता. फलटण जि. सातारा
८
मयत व्यक्तीचे वर्णन
९
२०/०६/२०२६ रोजी ११.३० वा
तपशिल
२०/०६/२०२६ रोजीचे सकाळी ०५.४५ वा.चे पूर्वी (नक्की वेळ माहित नाही)
अनोळखी पुरूष जातीचे प्रेत, वय अंदाजे ५५ वर्षे, उंची ५ फुट अंदाजे, रंगाने सावळा, केस पांढरे वाढलेले, डोळे काळे, नाक सरळ, दाढी पांढरी पिकलेली, बांधा मध्यम, अंगात मळलेला पांढरा शर्ट, मळलेली पांढ-या रंगाची पॅन्ट
वरिल तारीख वेळी व ठिकाणी यातील मौजे धुळदेव, ता. फलटण, जि. सातारा हददीत फलटण ते आसु जाणारे रस्त्याचे डावे बाजुस संजय महादेव शिरतोडे यांचे घराजवळ रोडचे साईड पटटीवर एक अनोळखी इसम अंदाजे वय ५५ वर्षे (नाव पत्ता माहित नाही) याच्या डोक्यावरून तसेच डाव्या हाताचे पंज्यावरून कोणत्यातरी अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवुन धडक देवुन अपघात करून अनोळखी इसमाचे गंभीर दुखापत करून त्याचे मरणास कारणीभुत झाला तसेच त्यास दवाखान्यात उपचारास घेवुन न जाता वाहनासह पळुन गेला आहे. वगैरे मजकुराने दिले खबरीवरुन फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. दाखल केला आहे.
सदर बेवारस व्यक्तीचा शोध घेणेकामी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेत तपास याद्या पाठवुन तसेच फलटण शहर पोलीस ठाणेचे हददीत मयत व्यक्तीबाबत विचारणा केली असता सदर मयत व्यक्ती बाबत काहीएक माहिती मिळुन आली नाही. आजुबाजुचे स्थानिक लोकांकडे मयत व्यक्तीचा फोटो दाखवुन तपास केला परंतु मिसिंग व्यक्ती बाबत काहीएक माहिती उपलब्ध झाली नाही.
कोणाकडे अधिक माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन – अयोध्या घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक फलटण शहर यांनी केले आहे.









