दुध काढण्याच्या मशीनचा इलेक्ट्रिक शॉक लागून गुणवरे येथील विवाहित महिलेचा अकस्मात मृत्यू! अवघ्या 1 वर्षाच्या मुलाचे आईचे छत्र हरपले, घटनेने परिसरात शोककळा 

दुध काढण्याच्या मशीनचा इलेक्ट्रिक शॉक लागून गुणवरे येथील विवाहित महिलेचा अकस्मात मृत्यू!

अवघ्या 1 वर्षाच्या मुलाचे आईचे छत्र हरपले, घटनेने परिसरात शोककळा

फलटण: कोल्हापूर परिक्षेत्र, जिल्हा सातारा, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत मौजे गुणवरे ता. फलटण येथे दि. 24/07/2026 रोजी सायंकाळी 06.45 वा. चे सुमारास प्रियंका तानाजी कर्णे वय 28 वर्षे, रा. गुणवरे ता. फलटण याचं दुध काढण्याच्या मशीनचा इलेक्ट्रिक शॉक लागून अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली.

*हकिगत थोडक्यात :*

फिर्यादी तानाजी तात्याबा कर्णे, वय 38 वर्षे, व्यवसाय शेती, रा. गुणवरे यांनी दिलेल्या खबरीनुसार, ते व त्यांची पत्नी मयत प्रियंका या नेहमीप्रमाणे जनावरांच्या गोठ्यात म्हशीचे दूध काढण्यासाठी गेल्या होत्या. दूध काढून झाल्यावर मशीनला जोडलेले कॅनचे झाकण काढून गोठ्यातील बोर्डाच्या पार्टीला अडकवण्यासाठी जात असताना प्रियंका यांना अचानक इलेक्ट्रिक शॉक लागला. त्यांनी जोरात आरडाओरडा केल्याने फिर्यादी यांनी धाव घेऊन त्यांना ओढून बाजूला केले. त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. नातेवाईकांच्या मदतीने त्यांना तात्काळ खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून रात्री 08.30 वा. चे सुमारास मयत झाल्याचे घोषित केले. त्यांच्या पाठीमागे छोटा 1 वर्षाचा मुलगा आहे.या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे *अकस्मात मृत्यू नं. 44/2025, बी.एन.एस.एस. कलम 194* अन्वये नोंद करण्यात आली आहे.

*आवाहन:* “पावसाळ्याच्या दिवसात शेतकरी बांधवांनी जनावरांच्या गोठ्यातील, शेतातील विद्युत उपकरणे, वायरिंग याची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.”- श्री.राजकुमार भुजबळ – पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!