पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा फलटण येथे मतदारांशी संवाद!
फलटण:पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने फलटण येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांची फलटण येथे सदिच्छा भेट व मतदारांशी संवाद साधला.
फलटण येथील सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षकवृंदाची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी मा. श्री. सचिन सूर्यवंशी बेडके साहेब (भैयासाहेब), मा. श्री. महेंद्र सूर्यवंशी बेडके साहेब, यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. गायकवाड मॅडम, उपप्राचार्य श्री.घनवट सर तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. राजाभाऊ निकम , आमिरभाई मेटकरी, महादेव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भेटीदरम्यान आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या आणि महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक संवाद साधला.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने फलटण वकील संघास सदिच्छा भेट देऊन उपस्थित विधिज्ञ बांधवांशी संवाद साधला.
यावेळी पदवीधरांचे प्रश्न, उच्चशिक्षित तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या संधी तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
या भेटीप्रसंगी ॲड. एन. एम. यादव साहेब, ॲड. वीरसेन कदम साहेब, ॲड. चतुर्भुज गावडे साहेब, ॲड. व्ही. एम. भोसले साहेब, ॲड. व्ही. डी. कदम साहेब, ॲड. एस. एम. मुळाणी साहेब, ॲड. ललित जाधव साहेब व ॲड. मेधा आहिवळे यांच्यासह विधिज्ञ बांधव उपस्थित होते.









