मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश! लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी


मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश

 

लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी

 

फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त आयोजनात झालेल्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. विविध कला प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत महाविद्यालयाच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचा तुरा रोवला.

 

या महोत्सवात महाविद्यालयाने लोकवाद्यवादन या स्पर्धेत प्रथम क्रमांक, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय क्रमांक, लघुपट स्पर्धेत तृतीय क्रमांक, तसेच लोककला, मूकनाट्य, नकला आणि पश्चिमात्य एकल वाद्यवादन या प्रकारांत चतुर्थ क्रमांक मिळवला. स्थळचित्रणात तृतीय क्रमांक, भित्तीचित्र निर्मिती पोस्टर स्पर्धेत पंचम क्रमांक आणि इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत पंचम क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची छाप उमटवली.

 

या यशाबद्दल सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एल. सी. वेळेकर आणि सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, कलात्मक अभिव्यक्ती, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे.

 

फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम, डॉ. टी.पी. शिंदे, सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक, सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि विभागातील सर्व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

 

मुधोजी महाविद्यालयाच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!