फलटणच्या यथार्थ सायन्स ॲकॅडमीच्या यशाची परंपरा कायम! १० वीच्या निकालात विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी!

फलटणच्या यथार्थ सायन्स ॲकॅडमीच्या यशाची परंपरा कायम!

१० वीच्या निकालात विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी!

फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता १० वीच्या निकालात फलटण, सासवड आणि नांदल येथील यथार्थ सायन्स ॲकॅडमीने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. ॲकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

विद्यार्थ्यांचे वैयक्तिक यश:

कु. श्रावणी सुनील कोळेकर: ९२.४०% गुण मिळवून ॲकॅडमीत प्रथम आणि श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, नांदल येथे द्वितीय क्रमांक पटकावला.

कु. तन्वी संतोष कोळेकर: ९१.००% गुण मिळवून ॲकॅडमीत द्वितीय आणि न्यू इंग्लिश स्कूल, सुरवडी येथे प्रथम क्रमांक मिळवला.

कु. सलोनी सतीश जगताप: ८९.४०% गुण मिळवून ॲकॅडमीत व श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला.

गुणवत्ता यादीतील प्रमुख विद्यार्थी:

ॲकॅडमीच्या गुणवत्ता यादीत राज सरक (८६.२०%), योगेश लंभाते (८६.००%), सानिका निकम (८५.६०%), सिद्धी कोळेकर (८५.२०%), हर्षदा कोळेकर (८४.००%), रिद्धी कोळेकर (८३.६०%), अश्विनी घनवट (८३.००%), सिद्धार्थ मोहिते (८१.८०%), अंजली कांबळे (८१.६०%), अनुष्का मुळीक (८०.८०%), समृद्धी जाधव (७८.६०%) , मयुर खताळ (७७.८०%), सिद्धी मुळीक (७७.८०%) , कृष्णा शेंडगे (७७.६०%) , गायत्री काळेल (७६.८०), श्रावणी रामदास कोळेकर (७६.२०%) ,तन्मय मोहिते (७४.६०%) , वैष्णवी भगत (७४.६०%) , कार्तिकी बनकर (७४.२०%) , रिद्धी मुळीक (७३.८०%) , सुजित कारंडे (७३.६०%) , ऋतुजा कोळेकर (७२.६०%) , सृष्टी कापसे (७२.४०%) , प्रगती अनपट (७२.२०%) , प्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. इतर अनेक विद्यार्थ्यांनी सन्मानजनक यश मिळवले आहे.

यशस्वी मार्गदर्शनाची जोड:

या यशाबद्दल बोलताना यथार्थ सायन्स ॲकॅडमीचे संस्थापक प्रा. विशाल रसाळ (M.Sc. B.Ed. Physics) म्हणाले की, “ज्ञान आमचे शस्त्र, संस्कार आमची ताकद” या ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि संकल्पना स्पष्ट करण्यावर भर देतो. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि ॲकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे दैदीप्यमान यश शक्य झाले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, फलटण, सासवड आणि नांदल परिसरात यथार्थ सायन्स ॲकॅडमीच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले जात आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!