मा. श्री. सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली गॅलेक्सी मल्टिस्टेटच्या ८ व्या शाखेचे उद्घाटन! अवघ्या एका वर्षात बारामतीत दुसऱ्या शाखेचा शुभारंभ; महाराष्ट्रासह विविध राज्यांत विस्ताराची घोडदौड


मा. श्री. सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली गॅलेक्सी मल्टिस्टेटच्या ८ व्या शाखेचे उद्घाटन!

 

अवघ्या एका वर्षात बारामतीत दुसऱ्या शाखेचा शुभारंभ; महाराष्ट्रासह विविध राज्यांत विस्ताराची घोडदौड

 

बारामती: के. बी. ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत कार्यरत गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या ८ व्या शाखेचे बारामती येथे गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या नवीन शाखेचे उद्घाटन गॅलेक्सी मल्टिस्टेटचे संस्थापक व चेअरमन तसेच के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक मा. श्री. सचिन यादव आणि बारामतीचे नगराध्यक्ष मा. श्री. सचिन सातव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, ग्राहक, सभासद तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत बारामती शहरात गॅलेक्सी मल्टिस्टेटची ही दुसरी शाखा सुरू झाली असून, पुण्यामध्ये देखील गॅलेक्सी कार्यरत आहे तसेच राज्यातील ही संस्थेची ८ वी शाखा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये गॅलेक्सी मल्टिस्टेट आपल्या शाखांचे जाळे सातत्याने विस्तारत असून, ग्राहकांना विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्था वेगाने पुढे जात आहे.

 

उद्घाटनप्रसंगी मा. श्री. सचिन यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गॅलेक्सी मल्टिस्टेटचे ध्येय केवळ आर्थिक व्यवहार करणे नसून प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत विश्वासू भागीदार बनणे हे आहे. भविष्यात आणखी अनेक शहरांमध्ये शाखा सुरू करून अधिकाधिक नागरिकांना दर्जेदार आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. गरजेच्या वेळी तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी गॅलेक्सीची गोल्ड लोन सुविधा अनेक ग्राहकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

के. बी. ग्रुप ऑफ कंपनीज हा कृषी, जैविक शेती, निर्यात, सहकार, आयुर्वेद तसेच इतर विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेला एक अग्रगण्य उद्योगसमूह आहे. समूहाने देशभरात विश्वासाची आणि ब्रँडची वेगळी ओळख निर्माण केली आहे. के. बी. उद्योग समूहाने करार शेतीच्या माध्यमातून २५,००० शेतकऱ्यांचा युरोपियन देशात दररोज १५ टन निर्यात करण्याचा टप्पा गाठला आहे.

समूहाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली असून, आजपर्यंत २००० पेक्षा जास्त लोकांना रोजगारनिर्मिती, शेतकरी विकास आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. गॅलेक्सी ग्रुपची उलाढाल १७५ कोटींपर्यंत पोहोचली आहे. तसेच ठेवींचा फलटणमध्ये विश्वास संपादन करून आता बारामतीमध्ये आपले पाऊल टाकले आहे.

 

यावेळी बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी गॅलेक्सीच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि वाढत्या शाखा विस्ताराचे कौतुक केले. बारामतीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात दुसरी शाखा सुरू होणे ही नागरिकांसाठी आनंदाची बाब असून, यामुळे परिसरातील लोकांना अधिक चांगल्या आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा सहज उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी माजी नगराध्यक्ष व माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, किरण तावरे, फलोत्पादन संघाचे चेअरमन वसंत घनवट, भाऊसाहेब काटे व ॲड. खारतोडे उपस्थित होते.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!