लोणंद येथील जगन्नाथ शेंडगे भारत भूषण पुरस्काराने सन्मानित
आरडगांव प्रतिनिधी ( प्रतिक भोईटे ): लोणंद येथील ब्ल्यु डायमंड इंग्लिश मिडीअम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री. जगन्नाथ शेंडगे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘भारत भूषण पुरस्कार’ प्रदान…
नवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदन येथे जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मा. रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री), मा. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय हवाई उड्डाण सहकार राज्यमंत्री), मा. सादिकअली सय्यद (जिल्हा न्यायाधीश, मुंबई) व मा. सतीश केदारी (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड) यांच्या शुभहस्ते शेंडगे यांचा सन्मान करण्यात आला.
मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटना तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १० डिसेंबर २०२५ रोजी हा सोहळा पार पडला. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना भारत भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी श्री. क्रीपाल सिंग (सायबर क्राईम ऑफिसर, पंजाब) व डॉ. जनरल अब्दुल अजीज खान (ICC रॉयल कोर्ट पीस ऑफिसर व चेअरमन, वर्ल्ड अँटीक्राईम असोसिएशन) उपस्थित होते.
हा सन्मान मिळाल्याबद्दल विद्यालयाच्या उपाध्यक्षा सौ. सुरेखा शेंडगे, सचिव/मुख्याध्यापिका सौ. हेमलता दीक्षित, खजिनदार सौ. शुभांगी धसाडे, व्यवस्थापक श्री. अजिंक्य भोसले, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वाहनचालक-मालक, पालक व विद्यार्थ्यांनी श्री. जगन्नाथ शेंडगे यांचे अभिनंदन केले.









