फलटण शहरात वृध्द महिलेला दिवसाढवळ्या लुटले! पोलिस असल्याचे सांगून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास!


फलटण शहरात वृध्द महिलेला दिवसाढवळ्या लुटले!

 

चोरांनी पोलिस असल्याचे सांगून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले!

 

 

फलटण शहर: फलटण शहर पोलिस ठाण्यामधून मिळालेल्या माहितीनुसार व कुसुम शिवाजी घाडगे वय 65 वर्षे रा. विद्यानगर, जाधववाडी ता. फलटण जि.सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून,

 

समक्ष पोलीस स्टेशनला हजर राहुन देते जबाब की मी वरिल ठिकाणी माझे कुटुंबासह राहणेस आहे. माझेसमवेत माझे पती शिवाजी असे आम्ही एकत्रात राहणेस आहोत. माझी दोन मुले शैलैश व विठ्ठल हे त्याचे कुटुंबासह बारामती येथे राहतात.

 

काल दिनांक-14/07/2026 रोजी मला कणकणी आलेने मी माझे राहते घरातुन विद्यानगर येथुन डिएड चौक ते उपळेकर महाराज मंदिर जाणारे रोडवरुन, व्होरा हॉस्पीटल जवळ पायी चालत निघाले होते. मी दुपारी 4.30 वाजणेचे सुमारास, व्होरा हॉस्पीटलचे बाजुला आले असता, रस्त्यावर उभे असणारे एका माणसाने आवाज दिला व मला आजी तुम्ही घाबरु नका, मी पोलीस आहे असे मला सांगुन, त्यांचे आयकार्ड दाखविले. त्यानंतर त्याने मला पुढे एका महिलेचे गळ्यातील मंगळसुत्र चोरी झाले आहे असे सांगुन तुम्ही सोने कशाला घातलेय असे म्हणाला व त्याने मला माझे गळ्यातील मंगळसुत्र व हातातील बांगड्या काढायला लावल्या. व तुम्ही त्या काढल्या नाही तर तुम्हाला पुढे पोलीस मोठा दंड करतील असे सांगीतले. त्याचवेळी रोडने जाणा-या दुस-या एका व्यक्तीस त्याने बोलावले व त्यास देखील तु सोन्याची चैन कशाला घातली आहेस पुढे चोरी झाली आहे तुझी चैन काढुन दे असे म्हणाला व त्या व्यक्तीने त्याची चैन काढुन ती कागदामध्ये ठेवण्यासाठी दिली व सदरचे कागदाची पुडी बांधलेवर तो इसम तेथुन निघुन गेला त्यानंतर पोलीस आहे असे सांगणा-या ईसमाने त्याचे बॅगेतील एक कागद काढला व त्यामध्ये मंगळसुत्र व बांगड्या काढुन ठेवा मी तुमच्या पिशवीत ठेवतो असे म्हणाला म्हणुन मी माझे गळ्यातील मंगळसुत्र, हातातील दोन सोन्याच्या बांगड्या काढुन सदरचा इसमाचे हातातील कागदामध्ये ठेवल्या. कागदाची पुढी बांधण्याचा बहाणा करुन, हातचलाखीने माझ्या बॅगेमध्ये खोट्या बांगड्या असलेला दुसराच कागद ठेवला. त्यावेळी मला थोडे गुंगी आल्यासारखे झाले होते. त्यामुळे मी तेथुन पुढे स्टेट बँकेकडे गेले. स्टेट बँकेचे पुढे आल्यानंतर मला संशय आलेने मी माझ्या पिशवीतील कागद काढुन पाहीला असता त्यामध्ये दुस-याच बनावट खोट्या बांगड्या ठेवलेल्या होत्या. तसेच माझे मंगळसुत्र देखील कागदात व पिशवीत नव्हते. त्यावेळी मला सदरचे पोलीस आहे असे सांगणा-या इसमाने व त्याचे सोबत असलेल्या चैन काढुन देण्याचा बहाणा करणारे इसमाने दोघांनी मिळून माझे गळ्यातील मंगळसुत्र व हातातील सोन्याच्या बांगड्या माझी फसवणुक करुन नेलेचे व त्याऐवजी खोट्या बांगड्या ठेवलेचे लक्षात आले. माझी फसवणुक करणारे इसमांचे वर्णन 1) मला पोलीस असलेचे सांगणा-या इसम हा अंदाजे 50 वर्षे वयाचा, उंची साधारणता साडेपाच फुट उंचीचा, अंगाने जाडसर, अंगामध्ये काळी पॅन्ट व ऑरेंज रंगाचा शर्ट असलेला, 2) दुसरा ईसम हा अंगाने जाड, साधारणता साडेपाच फुट उंचीचा, खांद्यास सॅक अडकवलेला, निळी जिन्स व पांढरा शर्ट घातलेला अशा वर्णनाचा असुन, त्यांना पुन्हा पाहीलेस मी ओळखेन. सदरचे घटनेनंतर माझी मुलगी आशा नरेंद्र कदम रा. मलटण फलटण ता. फलटण जि. सातारा हिचे मोबाईलवरुन फोन करुन, तीला घडलेली सर्व हकीगत सांगीतली. त्यानंतर तीने माझे जावई नरेंद्र कदम यांना माझेकडे पाठविले, मी घाबरलेने घरी जाउन आज रोजी तक्रार देणेस पोलीस स्टेशनला आले आहे. माझी फसवणुक करुन नेलेल्या बांगड्यांचे वर्णन खालीलप्रमाणे

 

1) 80,000/- रुपये त्यामध्ये एक गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसुत्र, अंदाजे

 

 

2) 1,00,000/- रुपये हातातील दोन सोन्याच्या बांगड्या प्रत्येकी दिड तोळे वजनाच्या जु.वा.किं.अं.

 

1,80,000/- रुपये.

 

येणेप्रमाणे वरिल वर्णनाचे व किंमतीचे दागिने दोन अज्ञात इसमांनी पोलीस असलेची बतावणी करुन माझी फसवणुक करुन नेले आहेत. म्हणुन माझी त्यांचेविरुध्द तक्रार आहे.

 

तरी दिनांक-14/07/2026 रोजीचे दुपारी 4.30 वाजणेचे सुमारास, डिएड चौक ते उपळेकर महाराज मंदिर जाणारे रोडवरुन, व्होरा हॉस्पीटल जवळ फलटण ता.फलटण जि.सातारा येथे दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पैकी 1) मला पोलीस असलेचे सांगणा-या इसम हा अंदाजे 50 वर्षे वयाचा, उंची साधारणता साडेपाच फुट उंचीचा, अंगाने जाडसर, अंगामध्ये काळी पॅन्ट व ऑरेंज रंगाचा शर्ट असलेला, 2) दुसरा ईसम हा अंगाने जाड, साधारणता साडेपाच फुट उंचीचा, खांद्यास सेक अडकवलेला, निळी जिन्स व पांढरा शर्ट घातलेला यांनी पोलीस असलेची बतावणी करुन, पुढे एका महिलेचे गळ्यातील मंगळसुत्र चोरी झाले आहे तुम्ही सोने कशाला घातलेय, तुम्हाला पोलीस मोठा दंड करतील असे म्हणुन मला माझे गळ्यातील मंगळसुत्र व हातातील बांगड्‌या काढायला लावुन त्या एका कागदामध्ये गुंडाळून, माझे पिशवीत ठेवलेचा बहाणा करून, हातचलाखीने माझ्या सोन्याचे बांगड्यांऐवजी खोट्या बांगडया कागदात गुंडाळुन पिशवीत ठेउन, माझे गळ्यातील 1,80,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे मणी असलेले, अंदाजे अडीच तोळे वजनाचे मंगळसुत्र, व प्रत्येकी दिड तोळे वजनाच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या माझी फसवणुक करुन, घेउन गेला आहे

 

सदरचे दोन अज्ञात इसमांविरुध्द तक्रार दाखल झाले असून पुढील तपास पोलीस पुनम बोबडे करीत आहेत.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!