फलटण राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांची सेवा उपक्रम!
फलटण: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण मुक्कामी असताना गेली १२ वर्ष वैष्णवांची सेवा हा उपक्रम फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने राबविला जात आहे .
याही वर्षी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपहार,नि-कॅप,मलम,औषधे वाटप करण्यात आले. यावेळी फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, शहर अध्यक्ष नगरसेवक पंकज पवार, राजेंद्र खलाटे,युवक जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस मनिषा साळुंखे,युवक शहर अध्यक्ष प्रीतम जगदाळे, अल्पसंख्यक सेल शहर अध्यक्ष अल्ताफ शेख, बाळमुकुंद भट्टड, ओबीसी सेल शहर अध्यक्ष विकास ननावरे,विजय जगताप,अभिलाष शिंदे, मंजेखान मेटकरी, सुनील निकोडे,अजय ढेंबरे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Views: 47









