पोलिसांची ड्युटी आठ तास करावी व महिला पोलिसांना दिवसा ड्युटी द्यावी.  मानव अधिकार संरक्षण समितीचे फलटणचे तहसीलदार डॉ . अभिजित जाधव यांना निवेदन

पोलिसांची ड्युटी आठ तास करावी व महिला पोलिसांना दिवसा ड्युटी द्यावी.

मानव अधिकार संरक्षण समितीचे फलटणचे तहसीलदार डॉ . अभिजित जाधव यांना निवेदन

फलटण प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी यांची ड्युटी आठ तासाची करावी.तसेच महिला पोलीस कर्मचारी यांची ड्युटी ही दिवसांमध्ये असावी या मागणीचे निवेदन फलटणचे तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांना मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली शाखा फलटण यांच्या वतीने दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या विचार करण्याची गरज आहे.पोलिसांनाही योग्य विश्रांतीची गरज आहे. चोवीस चोवीस तास सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडले जात आहे. तरी शासनाने पोलिसांची ड्युटी आठ तासाची करण्याचा निर्णय घेण्याची मागणी मानवाधिकर संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान दाठिया

यांच्या मार्गदर्शनाने व मानवाधिकर संरक्षण समितीचे राज्याचे जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या आदेशाने दिले आहे.

पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी व पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी वर्ग अतिशय कर्तव्यदक्ष प्रामाणिकपणे जिवाची पर्वा न कर्ता कर्तव्य बजावत असतात.आपल्या कुटुंबासोबत कुठल्याही परिस्थितीत कोणताही सण आणि इतर सुखासाठी वेळ देऊ शकत नाहीत. पोलिसांना २४ तास सतत जनसेवेसाठी सज्ज रहावे लागते. पोलीस दलातील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत ते कर्तव्यनिष्ठ असतात. आम्ही सामाजिक कार्यकर्ते असल्याने अनेक वेळा पोलिस बांधवांशी आमचा संपर्क आला आहे. आमच्या मनामध्ये पोलिस बांधवांनबाबत आदर आहे. पोलिसांनी जनतेला रात्रंदिवस तत्पर सेवा मिळावी म्हणून अनेक पथकेही स्थापन केली आहेत. उदा महिलांसाठी दामिनी पथक, जेष्ठ नागरीकांसाठी, लहान मुलांसाठी, वाहतुकीसाठी सतर्क अशा विविध अनेक जनतेच्या सेवेसाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. पोलीस बांधव चोवीस तास इतके प्रामाणिक पणे काम करीत असताना सुद्धा समाजातील काही लोक पोलिसांकडे अतिशय संशयी नजरेने पाहत असतात. समाजातील अशा लोकांनी पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. अति ताणामुळे पोलिसांचे मानसिक आरोग्य बिघडत असते. अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबियांना जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासाची असावी म्हणजे ते आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देतील.आज पोलिसांमुळे जनता सुरक्षित आणि सुखरूप आहे.पण पोलिसच असुरक्षित आहे. त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासाची असावी अशी मागणी फलटण मानव अधिकार संरक्षण समिती दिल्ली शाखा सातारा जिल्हा यांनी या निवेदनाद्वारे तहसीलदार यांना केली आहे.

यावेळी फलटण तालुकाध्यक्ष सुरज चव्हाण,फलटण तालुका महिला अध्यक्ष सौ.प्रीती भोजने,फलटण तालुका उपाध्यक्ष सुरेखा गोफणे, फलटण तालुका सचिव सौ.तेजश्री जाधव,निलेश भराडे ,विश्वास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो ओळ: फलटण: तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांना निवेदन देताना मानव अधिकार संरक्षण समितीचे पदाधिकारी.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!