मुधोजी महाविद्यालयात बी.कॉम व एम.कॉम विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनीक वातावरणात संपन्न!

मुधोजी महाविद्यालयात बी.कॉम व एम.कॉम विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनीक वातावरणात संपन्न!

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या बी.कॉम भाग ३ व एम.कॉम भाग २ विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ शनिवारी (दि. १४) उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयीन जीवनातील आठवणी, येथे मिळालेले ज्ञान व संस्कार यांची शिदोरी सोबत ठेवत विद्यार्थ्यांनी नव्या आयुष्याच्या प्रवासाला आत्मविश्वासाने सामोरे जावे, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.

मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना महाविद्यालयातून मिळालेले ज्ञान, कौशल्ये आणि संस्कार यांच्या बळावर भविष्यात उत्तुंग यश संपादन करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परिश्रम करत आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे आयक्यूएसी (IQAC) समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले. त्यांनी बदलत्या व्यावसायिक जगातील संधी, आव्हाने आणि करिअरच्या विविध पर्यायांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भविष्यातील वाटचालीसाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला.

वाणिज्य विभाग फॅकल्टी इन्चार्ज प्रा. ज्योत्स्ना बोराटे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत महाविद्यालयीन आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या भावनिक संवादामुळे सभागृहातील वातावरण क्षणभर भारावून गेले. करिअर कौन्सिलिंग व प्लेसमेंट सेलचे प्रा. डॉ. प्रशांत शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती देत योग्य नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले.

याप्रसंगी डॉ. सागर निकम, प्रा. विशाल गायकवाड व ॲड. प्रा. अभिजित कदम यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि यशाच्या उंच शिखरांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. टी. पी. शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात वेगळी ओळख निर्माण करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत प्राध्यापकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. या सोहळ्याला वाणिज्य विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो :मुधोजी महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या बी.कॉम व एम.कॉम विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!