सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांचा साधेपणा!
निंबळक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत पोषण आहाराचा आस्वाद!
फलटण: निंबळक ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शाळेचा पहिला दिवस व शाळा प्रवेशोत्सव दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये पहिली मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, वह्या, पेन,पुस्तके शाळेचा गणवेश देऊन प्रवेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल गावडे, पंचायत समिती फलटणचे गटविकास अधिकारी श्री प्रकाशकुमार बोंबले, केंद्रप्रमुख निकाळजे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल गावडे यांनी विद्यार्थ्यांसमवेत शालेय पोषण आहाराचा आस्वाद घेतला. व विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या व आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापक सौ.विद्या शिंदे,प्रमोद निंबाळकर सर,रविंद्र जंगम सर,कार्तिक कुचेकर सर,सौ.वैशाली झेंडे मॅडम,महेंद्र पिंगळे सर,मोहिनी शिंदे मॅडम, दैनिक सकाळचे पत्रकार प्रा.अमोल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.









