निरगुडी गावात  अवैध दारुधंद्याचा सुळसुळाट पोलिस प्रशासन गांधारीच्या भूमिकेत?  तरुणाई भरकटतेय, महिला वर्ग संतप्त


निरगुडी गावात  अवैध दारुधंद्याचा सुळसुळाट

पोलिस प्रशासन गांधारीच्या भूमिकेत?

तरुणाई भरकटतेय, महिला वर्ग संतप्त

 

 

फलटण: फलटण तालुक्यातील निरगुडी गावात ग्रामपंचायतीने दारुबंदीचा ठराव करूनही अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट सुरूच असल्याने पोलिस प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

ठरावानंतर संबंधित विक्रेत्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र त्या केवळ कागदावरच राहिल्याचे वास्तव समोर आले आहे.गावात सध्या अवैधरित्या दारूविक्री खुलेआम सुरू असून विक्रेते कोणतीही भीती न बाळगता राजरोसपणे हा गोरख धंदा करत आहेत.

 

विशेष म्हणजे, सासकल, गिरवी, विंचुर्णी आणि मांडवखडक या परिसरातील गावांमध्ये दारूविक्री बंद असताना निरगुडीमध्ये मात्र हा व्यवसाय तेजीत असल्याने “या विक्रेत्यांना कोणाचे अभय आहे?” अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.दररोज रात्री मोठ्या प्रमाणावर बाहेरगावाहून तळीराम निरगुडीकडे वळत असल्याने गावाचे स्वरूप ‘दारू केंद्र’ बनत चालले आहे. याचा थेट परिणाम स्थानिक तरुणाईवर होत असून अनेक तरुण दारूच्या आहारी जात असल्याचे चिंताजनक चित्र समोर येत आहे.या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

गावातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याआधी संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी महिला वर्ग व ग्रामस्थांकडून होत आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!