पंचायत समितीच्या युवा सभापती 9.45 वा.जनतेच्या सेवेसाठी कार्यालयात हजर
तर पंचायत समितीतील कर्मचारी यांचे टेबल 10.15 वा.तरी रिकामे
4 वर्षापासूनच्या प्रशासक काळापासून बेशिस्त वागणारे कर्मचारी वठणीवर येणार का?
फलटण: फलटण पंचायत समिती मधील कर्मचारी वेगवेगळ्या करणारे नेहमीच चर्चेत राहतात.यामध्ये टेबलावर झोपा काढणे असो,की लोकांची पैशासाठी कामे अडवणे असो. तसेच यात उशिरा येऊन लवकर जाणारे ही कर्मचारी आहेत. चहाच्या नावावर तानसतास कार्यालया बाहेर जाणे. आपली वैयक्तिक कामे करणे.घरी दुपारी जेवायला गेले की 4 ते 4.30 पर्यंत येणे असे उद्योगी लोक या ठिकाणी कार्यरत आहेत.
या अशा कर्मचाऱ्यांना गेल्या 4 वर्षापासून प्रशासक असल्याने बेशिस्त लागलेली आहे.यांना वठणीवर आणण्याचं काम हे नूतन युवा सभापती शिवांजली विक्रम भोसले यांना करावे लागणार आहे.आणि त्यांची त्यांनी आज चुणूक दाखवलेली आहे.आज त्या बरोबर 9.45.मिनिटांनी आपल्या कार्यालयात हजर झाल्या परंतु बहुतांश विभागातील कर्मचारी हे 10.15 मिनिट झाले तरी आले नव्हते. त्यांचा टाईम हा 10.30 आहे असे समजते. यामुळे प्रशासकीय कामे धीम्या गतीने चालू असतात. व कर्मचाऱ्यांचे काम हे पाट्या टाकण्याचे असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यावर लोकप्रतिनिधी यांनी ठोस भूमिका घ्यावी असे नागरिकांकडून प्रतिक्रिया येत आहेत.









