जनहिताच्या चार अटी मान्य म्हणुन भाजपामध्ये – नितीन भरगुडे – पाटील
खंडाळा प्रतिनिधी:. ता . २१ : कै .लक्ष्मणराव भरगुडे – पाटील यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या शब्द मिळाल्याने यापुढे भारतीय जनता पार्टीचे काम करणार असल्याचे जिल्हाची मुलुख मैदान तोफ म्हणुन नावलौकिक मिळवलेले व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे – पाटील यांनी आज सातारा येथे स्पष्ट केले . तर भाजपा कडुन शिरवळ जिल्हापरिषद गटाची उमेदवारी करणार आहे .
याबाबत भरगुडे – पाटील म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्याशी आज झालेल्या बैठकीत शिरवळ – मांढरदेवी रस्ता, तालुक्याच्या १४ गावांचा सिंचन पाणीप्रश्न,गावडेवाडी शेखमिरवाडी व वाघोशी तिन्ही उपसा सिंचन व तालुक्यातील औद्योगीकरणात स्थानिक लोकांना न्याय मिळावा या चार अटी नामदार जयकुमार गोरे यांच्या समोर ठेवल्या .यावेळी चारही अटी मान्य करण्यात आल्या .
कै . लक्ष्मणराव भरगुडे पाटील यांच्या पुण्यतिथी दिवशी या चारही अटींच्या पुर्तताचा शुभारंभ करण्याचा शब्द दिल्याने,भारतीय जनता पार्टीचे काम करण्याचे निश्चित केले आहे.
यासाठी जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले,उदयनराजे भोसले,मदन भोसले,अनुप सुर्यवंशी,अनिरुद्ध गाढवे व चंद्रकांत यादव यांचे मोठे योगदान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.तर या बैठकीसाठी तालुक्यातील पश्चिम भागातील जवळपास १०० कार्यकर्ते उपस्थित होते .
——
सातारा – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोबत नितीन भरगुडे पाटील व कार्यकर्ते .









