फलटण मधील प्राथमिक शिक्षकाची बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर केंद्रप्रमुख म्हणून ‘अशोक’ भरारी! जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी गांधारीच्या भूमिकेत! मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या भूमिकेकडे खऱ्या दिव्यांगांचे लक्ष!


फलटण मधील प्राथमिक शिक्षकाची बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर केंद्रप्रमुख म्हणून ‘अशोक’ भरारी!

 

 

जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी गांधारीच्या भूमिकेत! मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या भूमिकेकडे खऱ्या दिव्यांगांचे लक्ष!

 

 

फलटण: फलटण येथील एका प्राथमिक शिक्षकाने बोगस दृष्टीदोष असल्याचे प्रमाणपत्र काढून खात्यांतर्गत केंद्रप्रमुख परीक्षा दिली. व केंद्र प्रमुख म्हणून आज ते पाटण तालुक्यात बढती घेत असल्याचे प्रकरण पुढे आले आहे. खरे तर अशा बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ घेणाऱ्या लोकांची चौकशी सुरू आहे.

 

असे असताना सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी अनीस नायकवडी या प्रकरणावर गांधारीची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.ते लोकशाहीला डावलून ‘सावंतशाहीला’ साथ का देत आहेत.अशा लोकांना साथ देऊन ते खऱ्या दिव्यांगांचे नुकसान करत आहेत.खरे बोगस दिव्यांग ओळखता येत नसल्याने त्यांनाच दृष्टीदोष झाला आहे का हे पाहणे गरजेचे आहे.

 

 

या प्रकरणी आता सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कडूनच खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळेल अशी अपेक्षा दिव्यांग शिक्षक व्यक्त करण्यात येत आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!