फलटण पंचायत समितीची पहिली मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

फलटण पंचायत समितीची पहिली मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

फलटण: पंचायत समिती फलटण ची मासिक सभा दि. १३/०४/२०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पंचायत समिती फलटणचे सभागृहामध्ये सभापती कु. शिवांजली भोसले यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या सभेत सर्व प्रथम मागील कालावधीत निधन पावलेल्या मान्यवरांस श्रद्धांजली अर्पण करून दुखवटाचा ठराव घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाबाबत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच पद्मविभूषण लोकप्रिय गायिका आशा भोसले यांच्या दुःखद निधनाबाबत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, पशुसंवर्धन,एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प फलटण, इत्यादी विभागांचा आढावा घेण्यात आला.रस्ते आणि स्वच्छता या मुलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक गावापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेऊन काम करण्यावर भर देण्याची चर्चा सभागृहात झाली.

शासन निर्णय ६ ऑगस्ट २०२५ अन्वये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर ते ३१ मार्च दरम्यान राबविण्यात आले असून ८ घटकांवर १०० गुणांमध्ये मूल्यांकन करण्यात येत आहे.तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींनी चांगली कामगिरी केली असून त्यांच्या कामाची तपासणी विविध स्तरावर होणार आहे व उत्कृष्ट ग्रामपंचायतींना बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व ग्रामपंचायत सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

“माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानाबाबत डॉ.संतोष कोंडके तालुका आरोग्य अधिकारी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले व सर्व पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा माझेरी, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा कापशी, तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा फडतरवाडी तसेच खाजगी शाळांमध्ये प्रथम क्रमांक साखरवाडी हायस्कूल साखरवाडी, द्वितीय क्रमांक यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण, तृतीय क्रमांक तडगाव हायस्कूल तरडगाव आणि कु. अक्षदा विजय सस्ते रा.निरगुडी हिचे आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट ऑफ पुणे यामध्ये महाराष्ट्र राज्यातून एकमेव मुलगी निवड झाली असल्याने वरील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

सभेचे कामकाज सभापती कु. शिवांजली भोसले , उपसभापती अमोल सस्ते तसेच पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य व सदस्या, सचिव प्रकाशकुमार बोंबले गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!