फलटण तालुक्यातील स्वराज्य,शरयू साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा


फलटण तालुक्यातील स्वराज्य,शरयू साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत!

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

 

फलटण: हिंगणगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी फलटण तालुक्यातील स्वराज ऍग्रो उपळवे, शरयू ऍग्रो कापशी आणि किसनवीर युनिट क्रमांक २ म्हावशी या साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची ऊस बिले मोठ्या प्रमाणात थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

सभेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ऊस घातल्यानंतर नियमानुसार १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा होणे आवश्यक आहे. मात्र अनेक दिवस उलटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

यावेळी स्वराज ऍग्रो उपळवे, शरयू ऍग्रो कापशी आणि किसनवीर युनिट क्रमांक २ म्हावशी या कारखान्यांवर ज्यांची ऊस बिले थकीत आहेत अशा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. ऊस बिले तात्काळ न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी बैठकीला शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!