कुरवली पाटी बनला आहे अपघाताचा हॉटस्पॉट! टू व्हीलर व इर्टीगा गाडीची समोरासमोर धडक. अपघातात गोखळी येथील दुचाकीस्वार अरुण माने गंभीर जखमी!


कुरवली पाटी बनला आहे अपघाताचा हॉटस्पॉट!

 

टू व्हीलर व इर्टीगा गाडीची समोरासमोर धडक.

अपघातात गोखळी येथील दुचाकीस्वार अरुण माने गंभीर जखमी!

 

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस मिळालेल्या माहितीनुसार व अरुण तुकाराम माने वय-42 वर्षे व्यवसाय- हमाली रा. गोखळी ता. फलटण जि.सातारा यांनी समक्ष दिलेल्या फिर्यादीवरून मी माझी पत्नी संध्या, थोरली मुलगी अनिषा, धाकटा मुलगा आयुष, आई शिरसाबाई असे एकत्रीत राहणेस असुन आम्ही कामानिमित्त शिंगणापूर येथे स्थाईक आहे. मी सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे खाजगी हमाली काम करीत असतो.

 

दिनांक 10.03.2026 रोजी मी नेहमी प्रमाणे हमाली काम करुन पुणे पंढरपुर रोडने मी राहत असलेल्या शिंगणापुर येथे जाणेकरीता सायंकाळी 05.00 वा. चे सुमारास माझे मालकीचा दोन चाकी TVS SPORT-DK-5554 वरती नेहमी प्रमाणे निघालो होतो. मी अंदाजे सायंकाळी 5.30 वा. चे सुमारास कुरवली पाटी आंदरुड रोड कडे वळुन शिंगणापुर कडे जात असताना रस्ता ओलांडत असताना पंढरपुर बाजुकडुन पुणेकडे जाणारे लेनवरती अचानक पंढरपुर बाजुकडुन पुणे बाजुकडे इर्टीगा गाडी नंबर MH-12-WK-8184 ही भरधाव वेगात येऊन मी लावलेल्या गाडीकडे इंडीकेटरकडे दुर्लक्ष करुन मला जोराची धडक दिली. त्यामुळे मी गाडीच्या काचेवर जखमी होवुन पडलो. त्यानंतर मला काही अंतरावरती थांबलेल्या इर्टीगा गाडीचा बोनेट वरुन तेथे जमलेल्या लोकांनी खाली घेवुन 108 अॅम्बुलन्सने दवाखान्यात नेले. तेथे जमलेल्या लोकांकडुन सदर गाडी चालकाच नाव- किशोर ज्ञानेश्वर तनपुरे वय-35 वर्षे रा.धांगवडी ता. भोर जि.पुणे असे असलेचे समजले.

 

तरी दिनांक 10.03.2026 रोजी सायंकाळी 5.30 वा. चे. सुमारास माझे मालकीच्या मोटार सायकल क्र. TVS SPORT MH-11-DK-5554 वरुन पुणे पंढरपुर हायवे वरुन शिंगणापुर बाजुकडे वळत असताना मौजे- कुरवली पाटी येथे पंढरपुर बाजुकडुन येणारे इर्टीगा कंपनीची गाडी नंबर MH-12-WK-8184 ने मी वळत असताना गाडीवरील चालक -किशोर ज्ञानेश्वर तनपुरे वय-35 वर्षे रा.धांगवडी ता.भोर जि. पुणे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन अविचाराने चालवून मला धडक देवुन माझे व स्वताचे जखमीस, गंभीर जखमेस तसेच माझ्या गाडीचे अंदाजे 30,000/- रुपयाचे व त्याचे गाडी इटींगाचे दोन लाखाचे नुकसानीस कारणीभूत ठरला आहे.

 

फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस हवालदार अमोल चांगण करीत आहेत.

 

कुरवली पाटी येथे अपघाताच्या अनेक घटना यापूर्वी ही घडल्या आहेत. संबंधित विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!