नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा साधेपणा
सहकाऱ्यांसमवेत घेतला हॉटेल अतिथी येते नाश्त्याचा आस्वाद!
फलटण: फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री.समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आज दिवसभराच्या धावपळीतून आपली कामे करून, नगरपालिकेची सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहून, आळंदी येथून आलेल्या श्री.संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान विश्वस्तांच्या समवेत पालखी नियोजनाचा आढावा घेतला.
नगराध्यक्षांनी आपल्या या धावपळीच्या कामातून वेळ काढून सहकाऱ्यांसमवेत आज हॉटेल अतिथी नाश्त्याचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी होते. यामध्ये नगरसेवक राहुल निंबाळकर, सचिन अहिवळे, किरण राऊत, संदीप चोरमले, आप्पा मांढरे, व अमोल सस्ते हे उपस्थित होते.
Views: 59









