म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचा शुक्रवारी वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ 


म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचा शुक्रवारी वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ

 

म्हसवड: येथील फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाचा शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी वार्षिक परितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

 

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी ज्यांनी क्रीडा, कलाविष्कार,शैक्षणिक, क्षेत्रात महाविद्यालयाचे नाव गाजवले आहे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय खेळाडू सुखदेव बाबर, व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी हे असणार आहेत.तसेच सन्माननीय उपस्थिती मध्ये ॲड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने सदस्य गव्हर्निंग कौन्सिल फलटण एज्युकेशन सोसायटी,श्री. नितीनशेठ दोशी सदस्य महाविद्यालय विकास समिती, श्री.हेमंत रानडे ट्रेझरर फलटण एज्युकेशन सोसायटी,मा. प्राचार्य श्री.अरविंद निकम प्रशासन अधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटी,श्री.विलास रुपनवर अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना, श्री.विजय माने अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना हे उपस्थित असणार आहेत.

 

कार्यक्रम शुक्रवार दिनांक 27 मार्च सायंकाळी महाविद्यालयाच्या मैदानावरती सायंकाळी सहा वाजता सुरू होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय दीक्षित यांनी दिली आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!