फलटण – तांबमाळ येथे पालखी मार्गाचा ओढ्यातून काढलेला रस्ता पावसाळ्यात बनू शकतो धोकादायक! पुणे- पंढरपूर पालखी महामार्ग बनवताना ठेकेदाराच्या गंभीर चुका! नागरिक संतप्त.!

फलटण -तांबमाळ येथे पालखी मार्गाचा ओढ्यातून काढलेला रस्ता पावसाळ्यात बनू शकतो धोकादायक!

पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग बनवताना ठेकेदाराच्या गंभीर चुका! नागरिक संतप्त.

फलटण : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पुणे–पंढरपूर पालखी महामार्ग प्रकल्पातील कामांबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः पुणे कडून फलटण शहरात येणाऱ्या मार्गावर तांबमाळ येथील ओढ्यावर करण्यात आलेल्या कामामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत आहे. ओढ्याला जास्त पाणी आल्यास हा रस्ता पाण्याखाली जाणार असून यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो.

तांबमाळ परिसरात ओढ्यावर असलेल्या पुलाखालून थेट रस्ता काढण्यात आला आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी त्याची रचना अत्यंत धोकादायक असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पुण्याकडून फलटणमध्ये प्रवेश करताना प्रथम अचानक वळण, त्यानंतर ओढ्यातून जाणारा मार्ग आणि लगेच पुन्हा दोन वळणे अशी रचना असल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे.

स्थानिकांच्या मते, या ठिकाणी सरळ आणि सुरक्षित मार्गाची आवश्यकता असताना अनावश्यक वळणे देऊन रस्ता काढण्यात आला आहे. नागरिकांनी याठिकाणी स्वतंत्र टनेल किंवा सरळ मार्ग तयार करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे अपघात टाळता येतील आणि वाहतूक सुरळीत होईल.

दरम्यान, पालखी महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून ते अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. या प्रकल्पाची मुदत ऑक्टोबर २०२३ मध्येच संपली असतानाही काम अपूर्ण आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या सर्व त्रुटींमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून आवश्यक बदल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

पुणे पंढरपूर पालखी मार्गावर बाह्यवळण चौकातून फलटणला येण्यासाठी ओढ्यातून बनवलेला रस्ता चुकीचा असून हा रस्ता सरळ उड्डाणपूल तयार करून फलटणकडे जाण्यासाठी बनवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!