सदगुरू योगीराज गुणानाथ महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न.

सदगुरू योगीराज गुणानाथ महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न.

फलटण :  सदगुरू योगीराज गुणानाथ महाराज यांच्या २०६ व्या समाधी सोहळ्या निमित्त त्यांच्या चंदना सारख्या कार्याची त्यांच्या गुणांची व सामर्थ्याची यथार्थ गाथा योगीराज या चरित्र ग्रंथातून मोठ्या अभ्यासातून व परिश्रमातून संत साहित्यिक रवींद्र वेदपाठक यांनी मांडली आहे संत चरित्रांनी समाजाला दिशा मिळते संत साहित्य म्हणजे आनंदाची अनुभूती असते असे प्रतिपादन ह.भ.प.सुरेश महाराज सुळ यांनी पिंपळवाडी ता. फलटण येथे योगीराज या संत चरित्राचे प्रकाशन करताना सांगितले

या कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे साहित्यिक संपतराव टेंबरे प्रा. अब्दागिरे , साहित्यिक विकास शिंदे ,सातारा जिल्हा बँकेचे व्यवस्थापक प्रकाश पुरी , हजारो भाविकांच्या, मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत धार्मिक वातावरणात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना सुळ महाराज पुढे म्हणाले भारतीय समाजात संतांचे एक वेगळे स्थान आहे महाराष्ट्रात तर संतांची मोठी परंपरा आहे संत या शब्दाचा अर्थ सत या शब्दापासून आलेला आहे सत् या शब्दाचा अर्थ सतत, जे कालही होते, आजही आहेत, आणि उद्याही राहणार असे, विविध संतांनी वर्णन केल्याप्रमाणे संत आपल्या ज्ञानाने, आपणास आत्मज्ञानाचे दरवाजे खुले करतात

अध्यात्मिक क्षेत्र पिंपळवाडी, तालुका फलटण जिल्हा सातारा येथील श्री योगीराज गुणानाथ साधु महाराज यांच्या २०६ व्या संजीवन समाधी सोहळा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला यावेळी

समाधी सोहळ्याचे औचित्य साधून, श्री रवींद्र परशुराम वेदपाठक यांनी संपूर्ण माहिती घेऊन, विविध संतांचे चरित्रे वाचून लिहिलेल्या, श्री. योगीराज गुणानाथ महाराज चरित्र, अध्यात्मिक लेख, संतांच्या निवडक अभंगावरील निरूपण असलेले “योगीराज” या पुस्तकाचे प्रकाशन ह.भ.प. सुरेश महाराज सूळ,ह.भ.प. श्री प्रकाश पवार महाराज, व ज्येष्ठ साहित्यिक श्री सुरेश शिंदे, यांच्या शुभहस्ते झाले.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

error: Content is protected !!