यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे नवागतांचे ढोल ताशांच्या गजरात  उत्साही  स्वागत!


यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे नवागतांचे ढोल ताशांच्या गजरात  उत्साही  स्वागत

 

फलटण: सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात *प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत*

प्रशालेच्या प्रवेशद्वारापासून प्रशालेत प्रवेश घेतलेल्या नवागतांचे व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात, प्रशालेमध्ये *घोडे सवारी, बैलगाडी तसेच सनरूप फोरव्हिलर* मधून आनंदी व उत्साही वातावरणात वाजत गाजत औक्षण करून करण्यात आले.

 

नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक कुतूहल व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर एक समाधानी वृत्ती दिसून आली व त्यांनी त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेली प्रशालेची निवड ही योग्य आहे असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाले व काही पालकांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आपले मत व समाधान व्यक्त केले.

 

कार्यक्रमाची सुरुवात सौ तगारे एस एम व श्री वाघ जी बी यांनी स्वागत गीत गायन करून केली. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित संस्थेची शपथ घेतली.प्रशालेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या *प्राचार्या सौ गायकवाड एन एम ,उपप्राचार्य श्री पी डी घनवट सर, विभाग प्रमुख* यांचे हस्ते विद्यार्थी व पालकांना गुलाब फुल, पेन व संस्थेची दिनदर्शिका देऊन प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

 

इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय प्रमुख *मा श्री अमरसिंह संताजीराव सूर्यवंशी (बेडके)* यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पाठ्यपुस्तक प्रशालेच्या वतीने वाटप करण्यात आली.

 

प्रशालेमध्ये राबविण्यात येणाऱ्या *गुरुजी AIR आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश वाटप, मोफत सायकल वाटप, मोफत एस टी पास योजना, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, MHT-CET मार्गदर्शन केंद्र, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थी- पालक समुपदेशन केंद्र* या विविध उपक्रमांची माहिती दिली.

 

*कर्मयोगी कै. नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) व कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके)* यांनी आपले पूर्ण जीवन शिक्षण कार्यासाठी वाहून घेतले. आधुनिक काळाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय सुलभरीत्या निर्माण होण्यासाठी *कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके)* यांनी अथक परिश्रम करून विविध कोर्सेस या संस्थेत सुरू केले आहेत. *संस्थेचे मानद सचिव मा श्री डॉ सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) व नियामक मंडळाचे सदस्य मा श्री महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके)* यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची शैक्षणिक वाटचाल सुरू आहे.

 

याप्रसंगी नवागत विद्यार्थी व पालकांना प्रशालेतील ग्रंथालय, टेक्निकल विभाग, संगणक विभाग,AI लॅब, शालेय पोषण आहार विभागांची ओळख व माहिती शिक्षकांनी करून दिली. प्रशालेच्या वतीने शिक्षक पालक सहविचार सभा घेण्यात आले.

 

प्रशालेच्या वतीने प्रशालेतील सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी मिष्ठान्न भोजन *सांबर, भात व शिरा* देण्यात आला नवीन विद्यार्थ्यांना *बिस्कीटचे पुडे व पेन* वाटप करण्यात आले.

 

या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रशालेच्या *प्राचार्या सौ गायकवाड एन एम ,उपप्राचार्य श्री घनवट पी.डी.व सर्व विभाग प्रमुख, क्रीडा शिक्षक श्री माने डी आर, कला शिक्षिका सौ ढेंबरे मॅडम* यांनी अथक परिश्रम घेतले.


24
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!