मनी नाही भाव आणि देवा मला पाव.
विशेष लेख – – प्रा. वर्षा घोरपडे- कासुर्डे
कसं आहे कि, आपण किती ही पूजा अर्चा करू दे, दान धर्म करू दे , कितीही मंदिर पालती घालू दे, किंवा 24 तास देव देव करू दे,… जोपर्यंत तुमच्या मनात, अंतःकरणात निर्मळ, स्वच्छ, भाव नाही किंवा भावना नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे… निसरगता माणसाला दुसऱ्याची जान असते, जाणीव असते… आणि यां जाणिवांना आपण ओळखल पाहिजे,.., दुसऱ्याच अंतकरण ओळखता आले पाहिजे… दुसऱयाला नाहक दुःख देऊन मिळणार तरी काय… कसं आहे आपण पाप करून मिळवलेली मिळकत आणि तेच दान दिल तर समोरच्या ची गरज भागते ओ पण माझ्या पदरात शुन्य पुण्य मिळतं….. म्हणून मनात भाव चांगला असणं गरजेचं…. म्हणून यास पर्याय म्हणून सेवा करण्याचं पुण्य परमेश्वरा नें आपल्याला दिलंय आणि यातून शुद्ध अंतकरणाने सेवा देता आली पाहिजे, यासाठी आपलं घर आई वडील, सासूबाई, सासरे, हॉस्पिटल, तीर्थ क्षेत्र, अनाथ आश्रम, वृद्धाश्रमात आहे, शाळा, महाविद्यालय आहेत… सेवा करण्या साठी, नाहीच काही मिळालं आपल्याला तर आशीर्वाद तरी नक्कीच मिळतील…
आयुष्यात सर्वचं आपल्याला मनासारखं मिळेल याची काही शास्वती नाही मग घर, नोकरी, जोडीदार, मुलं बाळ, आई बाबा, काहीही असो… मनासारखं मिळेल असं नाही… पण जे माझ्या पदरात पडलंय त्याला मात्र मी माझ्या मनासारखं करू शकते, एवढी हिम्मत आपल्यात हवी… आणि यासाठी मनात भाव चांगला असणं गरजेचं……
रैनड्रॉप 🍁
लेखिका – प्रा. वर्षा घोरपडे- कासुर्डे
श्रीमती कांताबेन जे पी. मेहता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पाचगणी. येथे प्राध्यापिका आहेत.









