गिरीप्रेमी ग्रुपचा साखरगड ट्रेक संपन्न! शिवप्रेमींचा उत्स्फूर्त  सहभाग

गिरीप्रेमी ग्रुपचा साखरगड ट्रेक संपन्न!

शिवप्रेमींचा उत्स्फूर्त  सहभाग

सातारा प्रतिनिधी: गिरीप्रेमी ग्रुपचा ६६ वा ट्रेक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील साखरगड येथे संपन्न झाला. यामध्ये राज्यातील अनेक शिवप्रेमी सहभागी झाले होते. साखरगड हा शिवकाळातील एक टेहळणी गड होता. अत्यंत सुंदर असा हा गिरीदुर्ग आहे. या गडावर अंबाबाईचे अत्यंत सुंदर मंदिर आहे. या गडाच्या आणि मंदिराच्या उत्तम जतनासाठी आणि सौंदर्यासाठी २०१४ साली युनेस्कोचा पुरस्कार मिळालेला आहे. हे मंदिर यादवकालीन असून यामध्ये शिवकाळात आणि औंधच्या पंतप्रतिनिधीच्या काळात महत्त्वपूर्ण विकास झालेला आहे.

ट्रेकची सुरुवात सकाळी आठ वाजता झाली. सुरुवातीला पुण्याचे नामवंत उद्योजक व गिरिप्रेमी ग्रुपचे संचालक जालिंदर कातकडे साहेबांनी गिरिप्रेमीसाठी दिलेल्या टी शर्ट आणि टोपींचे वाटप झाले. गडावर अंबाबाईचे दर्शन घेतले. पी. एन. पाटील सर यांनी प्रास्ताविकात गिरिप्रेमी ग्रुपच्या ट्रेकच्या कार्याचा आढावा सांगितला. नवीन सदस्यांचा परिचय करून देण्यात आला. मंदिराचे पुजारी डॉ. चिन्मय आयाचित यांनी एमडी पदवी संपादन केल्याबद्दल आणि सयाजी कोकाटे यांनी MH-CET परीक्षेत ९९.३०% गुण मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय नेते मोहनआबा प्रतापराव भोसले, एम. आर. भोसले यांनी भेट देऊन गिरीप्रेमींना फळांचे वाटप केले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

नामवंत सीए शेखर शिंदे यांनी शिवचरित्र आणि जूनमधील ऐतिहासिक घडामोडींवर भाष्य केले. कराड हास्यक्लबने मनसोक्त हसवले. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी गड आणि देवीमंदिराबाबत माहिती दिली. राहुल कांबळे यांनी आभार मानले. रविदादा ढमढेरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे, भाऊ आल्हाट सर इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेक उत्तमप्रकारे संपन्न झाला. गडावर सर्वांनी घरून आणलेल्या जेवणाचे सहभोजन केले. हा आनंद अवर्णनीय असतो. अनेक भाज्या, चटण्या, भाकरी, ठेचा, शेंगा यांची रेलचेल असते. सर्वांनी गड स्वच्छ केला. शेखर शिंदे साहेबांनी सर्वांना देशी वृक्ष लागवडीसाठी बियांचे वाटप केले.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!