राजाळे येथे सियाराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे मोठ्या थाटत उद्घाटन
फलटण: राजाळे येथे सियाराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे मोठ्या थाटात उद्घाटन पार पडले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. सुयोग रामराव लेंभे यांचे हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. सनदी अधिकारी विश्वासराव भोसले हे उपस्थित होते.
यावेळी संस्थापक हनुमंत वसंत शेडगे,श्री सागर राजेंद्र खताळ, चेअरमन सौ.दिपाली हणमंत शेडगे व सर्व संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच गावचे युवा नेते आदित्य उद्योग समूहाचे चेअरमन विनोद शेडगे, सरपंच मोनाली हर्षल निंबाळकर,उपसरपंच शरद नारायण निंबाळकर, मा.सरपंच सविताताई शेडगे, सदस्य रामभाऊ निंबाळकर,पोलीस पाटील महेश शेडगे, तंटामुक्ती अध्यक्ष निंबाळकर, सर्व माजी सरपंच, सर्व ग्रा.पंचायत सदस्य, पिंपोडे बु. ता. कोरेगावचे उपसरपंच रणजीत लेंभे, ग्रामपंचायत सदस्य नितीन मदने, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार, युवा उद्योजक पुरुषोत्तम लेंभे, नितीन सकुंडे, सनी भोई, तसेच इतर सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.









