राजाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न
राजाळे महसूल मंडलातील 351 प्रकरणांचा जागीच निपटारा,
ग्रामस्थांचे समाधान!
फलटण: राजाळे ता.फलटण येथे मंडलस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यांच्या हस्ते लोकांना विविध कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांना विविध सेवा पुरवण्यात आला. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी पत्र वाटप- 22 वारस नोंदी शोधणे- 44, आपाक नोंदी 05, फेरफार अदालत 41,7/12 दुरुस्ती अर्ज – 17,7/12 वाटप – 124, 8 अ वाटप 71, तक्रार रजिस्टर निकाल – 05, मळइ जमीन प्रकरण – 01, एकुमी नोंद कमी करणे -18,लक्ष्मी मुक्ती योजना – 03,
याप्रमाणे नागरिकांना सुविधा पुरवण्यात आल्या. सदर कार्यक्रमाला प्रांत अधिकारी प्रियंका आंबेकर,तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, सरपंच मोनाली निंबाळकर , उपसरपंच शरद निंबाळकर, मंडलाधिकारी कैलास जाधव, तलाठी रूपाली अडसुरे, ग्रामसेवक आनंदराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला राजाळे महसूल मंडलातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.









