मराठी माध्यमातून शिकलेल्या फलटणच्या वेदांत भोईटेची वैद्यकीय प्रवेशात बाजी! नीट परीक्षेतील यशाच्या जोरावर जळगावच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश


मराठी माध्यमातून शिकलेल्या फलटणच्या वेदांत भोईटेची वैद्यकीय प्रवेशात बाजी!

 

नीट परीक्षेतील यशाच्या जोरावर जळगावच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश

 

फलटण : मराठी माध्यमातून शिक्षण घेत स्वकष्ट, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर फलटणचा वेदांत सुनील भोईटे याने नीट परीक्षेत यश मिळवत एमबीबीएस प्रवेशाचे स्वप्न साकार केले आहे. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात त्याला एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला असून, त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मूळचे फलटणचे रहिवासी असलेले व सध्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुनील भोईटे यांचा वेदांत हा सुपुत्र आहे. त्याने विद्याधाम प्रशाला शिरूर आणि चैतन्य अकॅडमी बारामती येथे शिक्षण पूर्ण केले. मराठी माध्यमातून शिक्षण घेत असतानाच वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे ध्येय त्याने निश्चित केले आणि नीट परीक्षेच्या तयारीसाठी कठोर परिश्रम घेतले. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.

मातृभाषेतून शिक्षण घेत असतानाही कठोर परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवता येते, हे वेदांतने सिद्ध केले आहे. त्याच्या या यशामुळे भोईटे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वेदांतवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!