कृषि विभागाच्या सासकल येथील नैसर्गिक शेतीशाळेत शेतकऱ्यांचे प्रबोधन!
-
शेती शेतकऱ्यात कार्यरत फलटण तालुक्यातील एकमेव सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे सचिन जाधव!
फलटण – शेतीशाळेची सुरुवात प्रतिज्ञांनी करण्यात आली महाराष्ट्र नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कृषी विभागामार्फत मका पीक शेतीशाळेचे आयोजन सासकल ता फलटण जिल्हा सातारा येथे करण्यात आले होते.
मा प्रधान सचिव कृषि परिमल सिहं,तसेच कृषि आयुक्त महाराष्ट्र राज्य सूरज मांढरे यांच्या सूचना नुसार शेतकरी शेतीशाळा मध्ये एल निनो च्या अनुषंगाने कमी पाण्यावर येणार दुष्काळसहन करणाऱ्या पिकाच्या निवडीबाबत मार्गदर्शन, पेरणीपूर्वी नियोजन व हवामान आधारित कृषी सल्ला चा अवलंब, पावसाच्या पाण्याचे संधारण शेततळे जलसंधारण,ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर, आंतरपीक, मिश्र पीक बहुपीक पद्धतीचा अवलंब,मुदा आरोग्य पत्रिका व्यवस्थापन व सेंद्रिय कर्बवाढीसाठी उपाय योजना, पीक विमा योजना, हवामान आधारित सल्ला सेवा, जोखीम व्यवस्थापनाची माहिती,चारा व्यवस्थापन व पशुधन संरक्षण उपाय, हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक घेतले जाणार आहेत वरील उपक्रम राबविण्यास सुरवात करण्यात आले आहे
मा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी विडणी अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सासकल येथे शेती शाळेचे आयोजन करण्यात आले आहे
यावेळी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव चे ऊस विशेषयज्ञ डॉ राजेंद्र भिलारे यांनी नैसर्गिक शेती शाळा मिशन व संतुलित खताचा वापर जागृती अभियान अंतर्गत सुपीकता माती अधिक उत्पादन समृद्ध शेतकरी यानुसार सुपीक माती, गांडूळ, जैविक खत,कंपोस्ट खत, हिरवळीचे खत याबाबत सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले
ऊस रोग शास्तज्ञ् डॉ सूरज नलवडे यांनी एल निनो पार्श्वभूमी वरती फळपीक व पीकाना अच्छादन व पाणी व्यवस्थापनामध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब, कमी कालावधीतील पीक नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शक त्यांनी केले
कनिष्ठ संशोधन सहाय्यक संतोष शिंदे यांनी सेंद्रिय निविष्ठा बाबत मार्गदर्शन केले
यावेळी मा उप कृषी अधिकारी विडणी अजित सोनवलकर, तसेच कृषी सेवारत्न सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीटी एम सचिन आवारे तसेच कनिष्ठ संशोधन सहाय्यक संतोष शिंदे ऊस रोग शास्तज्ञ् डॉ सूरज नलवडे,कृषि सहायक नवनाथ रसाळ तसेच कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी तसेच शेतीशाळामध्ये सहभागी शेतकरी उपस्थित होते. शेती शाळेचे प्रस्तावना व आभार कृषि सेवारत्न सहाय्यक कृषी अधिकारी सासकल सचिन जाधव यांनी केले









