कु. स्नेहल पवार हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून जलसंधारण अधिकारी वर्ग-२ (राजपत्रित) पदी निवड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने फलटण येथील कुमारी स्नेहल मारुती पवार हिची जलसंधारण अधिकारी वर्ग 2 (राजपत्रित) पदी निवड झाली आहे.
कुमारी स्नेहल मारुती पवार हिचे बारावीपर्यंतचे शिक्षण मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे झाले असून तिने पुणे येथील सिंहगड कॉलेज मधून बी.ई. सिव्हिल ही पदवी धारण केली आहे. व COEP पुणे येथे एम टेक करीत आहे.
कु.स्नेहल हिचे वडील मारुती जनार्दन पवार हे पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत.त्यांच्या आई या एक गृहिणी आहेत. त्यांचे या निवडीबद्दल निंबळक येथील ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन होत आहे.
Views: 176









