उपसभापती अमोल सस्ते ऑन फील्ड! सोनवडी खुर्द गावातील अतिक्रमण झालेला रस्ता केला खुला! सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब  सोनवलकर यांच्या लढ्याला अखेर यश!

उपसभापती अमोल सस्ते ऑन फील्ड!सोनवडी खुर्द गावातील अतिक्रमण झालेला रस्ता केला खुला!

सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब  सोनवलकर यांच्या लढ्याला अखेर यश!

फलटण: सोनवडी खुर्द ता.फलटण येथील ग्रामपंचायत 23 नंबर ला दप्तरी नोंद असलेला रस्ता क्रमांक 3 पाणीपुरवठा विहीर ते बेघर वस्तीतून सोमेश्वर मंदिराकडे जाणारा ग्रामपंचायतचा रोड हा तीन सहा 2019 पासून जाणून बुजून मध्य ठिकाणी बंद केलेला होता.

त्यासाठी अनेक वर्ष सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वसंत सोनवलकर यांनी प्रशासनाला पत्रव्यवहार करून दोन वेळा आत्मदहनाचे पत्र देऊन सुद्धा न्याय मिळालेला नव्हता.

अखेर फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते यांनी पुढाकार घेऊन स्वतः त्या ठिकाणी थांबून ते अतिक्रमण पोलिस बंदोबस्तामध्ये काढून घेऊन रस्ता खुला करण्यात आला.

यासाठी जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई कांबळे ,पंचायत समिती सदस्या विजया हनुमंत सोनवलकर यांना हे प्रकरण लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ही मनापासून लक्ष देऊन चार ते पाच वर्षाच्या या कायदेशीर संघर्षाला अखेर यश मिळवून दिले आणि रस्त्यावर अतिक्रमण केलेले हे काढण्यात उपसभापती अमोल सस्ते यांनी स्वतः थांबून बसून प्रशासनाला सांगून तो कित्येक वर्षाचा रस्त्याचा प्रलंबित प्रश्न हा मार्गी लावला.

त्यामुळे गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनवलकर यांच्यावतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते,आणि जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई संदीप कांबळे, पंचायत समिती सदस्या विजयाताई हनुमंत सोनवलकर यांचे मनापासून आभार मानले आहेत.

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!