भारतीय स्टेट बँकेच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त फलटण शाखेकडून गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
फलटण : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय स्टेट बँक फलटण शाखेचे शाखाधिकारी चंद्रकांत जगताप,फलटण शेती शाखेचे शाखाधिकारी योगेश कोरडे,वरीष्ठ लिपिक विष्णुपंत जाधव,मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
भारतीय स्टेट बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही सदैव कटिबद्ध आहे.विदयार्थ्यांनो नियमित बचतीची सवय लावा, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या असे शाखाधिकारी चंद्रकांत जगताप आणि योगेश कोरडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी उपस्थित सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि त्यांना धन्यवाद दिले.किशोर पवार यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.
फलटण फोटो: गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करताना भारतीय स्टेट बँक शाखा फलटणचे प्रमुख चंद्रकांत जगताप व योगेश कोरडे,समवेत मनीष निंबाळकर आणि इतर.









